Antarctica Dooms Day Glacier Dainik Gomantak
ग्लोबल

Dooms Day Glacier: अंटार्क्टिकावरील 'डुम्स डे' हिमखंड वितळतोय... जगातील संशोधकांमध्ये घबराट

समुद्राच्या पाणी पातळीत होणारी 'इतक्या' फुटांची वाढ: नेचरमध्ये नवे संशोधन प्रकाशित

Akshay Nirmale

Antarctica Dooms Day Glacier: अंटार्क्टिकावरील गुजरातच्या आकाराएवढा 'डुम्सडे ग्लेशियर' वितळू लागला असून तो आता कोसळण्याच्या मार्गावर आहे. ताज्या माहितीनुसार या हिमखंडाच्या पडझडीमुळे समुद्राच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.

नेचर या जर्नलमध्ये ब्रिटिश अंटार्क्टिक सर्वेक्षणाच्या संशोधकांनी नव्या अभ्यासाचे निष्कर्ष प्रकाशित करून याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

थ्वाईट्स (Thwaites) असे या ग्लेशियरचे नाव असून त्याला 'डूम्सडे ग्लेशियर' म्हणूनही ओळखले जाते. या हिमखंडाचा आकार भारतातील गुजरात राज्याच्या बरोबरीचा मानला जातो आणि तो कोसळल्याने समुद्राच्या पातळीत 10 फुटांपर्यंत वाढ होऊ शकते.

कोमट पाणी या भागात पृष्ठभागाच्या अर्ध्या किलोमीटरहून अधिक खाली पोहोचले आहे आणि आता थेट हिमखंडाच्या भगदाडांमध्ये आणि खड्ड्यांमध्ये शिरत आहे. त्यामुळे दरवर्षी 43 मीटर या दराने नवीन खोरे तयार होत आहे.

याला या ग्लेशियरला डूम्सडे ग्लेशियर म्हणतात कारण याची सर्वाधिक लांबी 120 किलोमीटर इतकी रूंद आहे. आणि हा हिमखंड आता वेगाने वितळू लागला आहे.

डुम्स डे याचा अर्थ विनाशाचा दिवस असा घेतला जातो. कयामत का दिन म्हणजे डुम्स डे. त्यामुळे या नावारून या ग्लेशियरचे गांभीर्य लक्षात येऊ शकते. या ग्लेशियरमध्ये समुद्राची जागतिक पातळी अर्धा मीटरपेक्षा जास्त वाढवण्याची क्षमता आहे.

दरवर्षी, या ग्लेशियरमधून कोट्यवधी टन बर्फ महासागरात सोडला जातो. समुद्राच्या पाणी पातळीतील जी वार्षिक वाढ असते, त्यातील सुमारे 4 टक्के वाढ एकट्या या ग्लेशियरमुळे होत आहे.

CNN च्या एका अहवालानुसार, हा हिमखंड जिथे समुद्राला येऊन मिळतो ते स्थान आता 1990 च्या दशकातील स्थानापासून सुमारे नऊ मैल (14 किलोमीटर) मागे गेले आहे. म्हणजेच समुद्र 14 किलोमीटर आत घुसला आहे. म्हणजेच एवढा भाग वितळला आहे.

थ्वाईट्स पूर्णपणे वितळल्यास काय होईल?

CNN च्या माहितीनुसार, थ्वाईट्सच्या एकूण पतनामुळे समुद्राची पातळी दोन फूट (70 सेमी) पेक्षा जास्त वाढू शकते, ज्यामुळे जगभरातील किनारी शहरांचा विनाश होऊ शकतो. थ्वाईट्स हा ग्लेशियर पश्चिम अंटार्क्टिकाच्या आसपासच्या बर्फासाठी नैसर्गिक धरण म्हणून देखील काम करत आहेत.

तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की, जर थ्वाईट्स कोसळले तर समुद्राची पाणी पातळी सुमारे 10 फूटाने वाढेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT