Vaccination Dainik Gomantak
ग्लोबल

भारतीयांसाठी स्वित्झर्लंडचे दरवाजे खुले पण...

दैनिक गोमन्तक

कोरोनामुळे (Covid 19) स्वित्झर्लंडमध्ये (Switzerland) लागू करण्यात आलेले कोरोना प्रतिबंध नियम 26 जूनपासून शिथील करण्यात आले आहेत. त्यामुळे भारतामधून (India) येणाऱ्या नागरिकांसाठीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असतील किंवा कोरोनामधून ठिक झाले असतील अशा नागरिकांना आता कोणत्याही चाचणीशिवाय तसेच विलगीकरणाशिवाय स्वित्झर्लंडमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

जे रुग्ण कोरोनातून बरे झाले नाहीत किंवा ज्याचं लसीकरण (Vaccination) करण्यात आलेले नाही, त्यांना मात्र निगेटिव्ह RTPCR चाचणी अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांना देशामध्ये प्रवेश केल्यानंतर विलगीकरण कक्षात राहणंही बंधनकारक करण्यात आले आहे, अशी माहिती स्वित्झर्लंड सरकारने दिली आहे. ज्या ठिकाणी कोरोनाच्या नव्या डेल्टा व्हेरिएंटचा (Delta variant) प्रसार झालेला आहे अशा इतर देशांसाठीही असेच नियम लागू असतील असंही सांगण्यात आले आहे.

तसेच, स्वित्झर्लंड सरकारकडून असंही सांगण्यात आले आहे की, देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी कोविड प्रमाणपत्र जर कोणाला हवं असेल तर तेही देण्यात येईल. स्वित्झर्लंडमध्ये हे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. हॉटेल, मॉलमध्ये जर प्रवेश नाकारण्यात आला तर हे प्रमाणापत्र दाखवल्यानंतर सदर व्यक्तीला प्रवेश देण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र संपूर्ण लसीकरण किंवा कोरोना झाल्याचा कालवधी याच्या आधारावर देण्यात येणार आहे.

स्वित्झर्लंडमधील मुखपट्टीची सक्तीही लवकरच रद्द करण्यात येणार आहे. त्याचबरोबर हॉटेलमध्ये जाऊन भोजनाचा आस्वाद घेण्यावरील निर्बंध हटवण्यात येतील. या महिन्याच्या अखेरपर्यंत देशामधील अर्ध्याहून अधिक प्रौढांचं लसीकरण पूर्ण होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात हाय व्होल्टेज ड्रामा, वर्षा उसगांवकर - पॅडी कांबळे यांच्यात वाद Video

दक्षिण गोव्यात Swiggyचे डिलिव्हरी बॉय आक्रमक; कंपनीला राज्यातून हद्दपार करण्याची मागणी

Goa Today's News Live: गोवा आघाडीत बिघाडी? पाटकरांच्या 'त्या' विधानाला काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरेंचाही पाठींबा!

ISL 2024-25: आजच्या सामन्यात एफसी गोवाला ऐतिहासिक विक्रमाची संधी! ठरणार पहिलाच संघ

Cutbona Jetty: 'ते' अजूनही 'कुटबण' स्वच्छतेत सामील होऊ शकतात! मंत्री सिक्वेरांचे आमदार सिल्वांना आवाहन

SCROLL FOR NEXT