पाकिस्तान: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील निमलष्करी दलाच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये तीन दहशतवादी मारले गेले आहेत. या हल्ल्यात 22 जण जखमी झाल्याची माहिती आहे. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मृतांच्या संख्येची पुष्टी होऊ शकली नाही. वृत्तानुसार, काल रात्री खैबर पख्तुनख्वामधील टँक जिल्ह्यातील एफसी फोर्टवर आत्मघातकी हल्लेखोरांनी हल्ला केला. (Terrorist attack on paramilitary base, 22 injured in pakistan)
पाकिस्तानी (Pakistan) मीडिया रिपोर्ट्सनुसार, दहशतवादी नुष्की आणि पंजगुरच्या शैलीत हल्ला करत होते. नुष्की आणि पंजगुरमध्ये अनेक दिवस दहशतवादी कॅम्पमध्ये लपून बसले होते आणि त्यांनी डझनभर जवानांना ठार केले. असे सांगण्यात येत आहे की हे हल्लेखोर घातक अमेरिकन शस्त्रास्त्रांनी सज्ज होते.
घटनास्थळावरून तीन दहशतवाद्यांचे मृतदेह (Death Body) सापडले आहेत. या परिसरात जाणारे सर्व रस्ते प्रशासनाने बंद केले आहेत. येथे, पाकिस्तानमधील राजकारण्यांना लक्ष्य करण्यात गुंतलेल्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.
वृत्तानुसार, लक्की मारवत भागातील शेरी खेलमध्ये दहशतवाद्यांकडून गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दल आणि पोलिसांनी 28 आणि 29 मार्चच्या रात्री ही कारवाई केली. तहरीक-ए-तालिबानचे (Taliban) चार संशयित दहशतवादी राजकारण्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. मात्र, त्यातील एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला.
या सर्वांकडून स्फोटके जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यासोबतच दहशतवाद विरोधी कायदा आणि स्फोटक द्रव्ये कायद्यान्वये दहशतवाद विरोधी विभागाच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार संशयित दहशतवाद्यांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.