Terrorist Attack In Karachi Pakistan Police Headquarters  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: कराचीत पोलीस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला, प्रचंड गोळीबार; Video

Major Terrorist Attack In Pakistan: पाकिस्तानातील कराचीमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची बातमी येत आहे. यावेळी दहशतवाद्यांनी कराची पोलीस मुख्यालयाला लक्ष्य केले आहे.

Manish Jadhav

Major Terrorist Attack In Pakistan: पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. यावेळी दहशतवाद्यांनी कराचीतील पोलीस मुख्यालयाला लक्ष्य केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे सहा फिदाईन इमारतीत घुसले आणि त्यांनी पोलीस प्रमुख आणि इतर अनेकांना ओलीस ठेवले.

त्याचवेळी, येथे प्रचंड गोळीबारही होत आहे. अनेक जण ठार आणि जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानच्या जिओ न्यूजनुसार, या गोळीबारात एक बचाव अधिकारी जखमी झाला असून त्याला रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे.

चकमक सुरुच

हे पोलिस मुख्यालय कराची शहरातील शरिया फैसल येथे आहे. पाकिस्तानच्या जिओ न्यूजने दावा केला आहे की इमारतीमध्ये 8 ते 10 दहशतवादी असू शकतात. याशिवाय जोरात स्फोटांचे आवाज ऐकू येत असल्याची बाबही समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. पुरेसा पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला असून दहशतवाद्यांना घेरण्यात आले आहे.

असा हल्ला केला

या दहशतवाद्यांनी (Terrorists) आधी पोलीस मुख्यालयावर सहाहून अधिक हँडग्रेनेड फेकल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर सर्वजण आत शिरले. या प्रकरणाची माहिती मिळताच पाकिस्तानचे क्विक रिस्पॉन्स फोर्स घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी नागरिकांना तेथून बाहेर काढण्याची मोहीमही सुरु केली आहे. प्रांताचे मुख्यमंत्रीही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kasule: तळ्याच्या रक्षणासाठी केली श्रीगणरायाची स्थापना, पेडण्याच्या राजाचा Video Viral

Adivasi Bhavan: आदिवासी भवनाची प्रक्रिया ‘जीएसआयडीसी’कडून सुरू! 60 कोटींचा प्रकल्‍प होणार 2 वर्षांत

FDA Raid: कळंगुट-बागा येथे 'सर्जिकल स्ट्राईक! निकृष्ट काजू विकणाऱ्यांवर चाप; एका रात्रीत 8 दुकाने, 3 रेस्टॉरंट बंद

Goa Rain: पाऊस थांबला, उकाडा वाढला! दमट हवामानाने नागरिक त्रस्त; तुरळक सरी कोसळण्याची शक्यता

Goa News: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त गोव्यात ‘सेवा पंधरवडा’! लोकसहभागातून राबवले जाणार उपक्रम

SCROLL FOR NEXT