Accident  Dainik G0mantak
ग्लोबल

Mexico Bus Accident: मेक्सिकोमध्ये भीषण अपघात, 80 फूट खोल दरीत कोसळली बस; 27 जणांचा मृत्यू

Mexico Bus Accident: मेक्सिकोमध्ये एक प्रवासी बस पहाडी रस्त्यावरुन घसरुन दरीत कोसळल्याने 27 जणांचा मृत्यू झाला आहे.

Manish Jadhav

Mexico Bus Accident: मेक्सिकोमध्ये एक प्रवासी बस पहाडी रस्त्यावरुन घसरुन दरीत कोसळल्याने 27 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात बुधवारी दक्षिणेकडील ओक्साका राज्यात झाला. घटनास्थळावरील छायाचित्रांमध्ये बचाव कार्य करणारे कर्मचारी घटनास्थळी काम करत असताना क्षतिग्रस्त झालेले वाहनांचे ढिगारे दिसतात.

एएफपीनुसार, ओक्साका राज्याचे अभियोजक बर्नार्डो रॉड्रिग्ज अलामिला यांनी सांगितले की, "प्राथमिक माहितीनुसार, 27 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 17 जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी प्रदेशातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताच्या (Accident) कारणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.'' ते पुढे म्हणाले की, प्राथमिक संकेत यांत्रिक बिघाड असल्याचे सूचित केले जात आहे.

जखमींपैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक

सिव्हिल प्रोटेक्शन एजन्सीच्या म्हणण्यानुसार, जखमींना रुग्णालयात (Hospital) नेले तेव्हा किमान सहा लोक बेशुद्ध आणि गंभीर अवस्थेत होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्थानिक वाहतूक कंपनी चालवत असलेली बस मंगळवारी रात्री राजधानी मेक्सिको सिटीतून सँटियागो डी योसोंडुआ शहराकडे निघाली होती.

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले'

राज्याचे अधिकारी जीसस रोमेरो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटले असावे... बस 25 मीटर (80 फूट) खोल दरीत कोसळली.' स्थानिक वाहतूक कंपनी मेक्सिको सिटी येथून दररोज सेवा पुरवते, असेही त्यांनी सांगितले. जखमी प्रवाशांना क्षेत्रीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे, तर बचाव कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मृतांचे मृतदेह बाहेर काढले.

ओक्साका राज्याच्या राज्यपालांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले

ओक्साका राज्याचे गव्हर्नर सॉलोमन जारा यांनी पीडितांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करताना सोशल मीडियावर लिहिले की, 'माग्डालेना पेनास्को येथे झालेल्या दुर्घटनेबद्दल आम्हाला मनापासून खेद वाटतो.' ते म्हणाले की, 'आमचे कर्मचारी घटनास्थळावर काम करत आहेत आणि जखमींना सर्व मदत पोहोचवली जात आहे.'

'मेक्सिकोमध्ये जीवघेणे रस्ते अपघात वारंवार होतात'

AFP च्या मते, मेक्सिकोमध्ये जीवघेणे रस्ते अपघात सामान्यतः उच्च वेग, खराब वाहन स्थिती किंवा ड्रायव्हरच्या थकव्यामुळे होतात. बरेच लोक प्रवासासाठी बसेसवर अवलंबून असतात, ज्या लहान वाहतूक कंपन्यांद्वारे चालवल्या जातात. देशातील महामार्गांवर मालवाहू ट्रकचे अपघातही वाढले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: नोव्हेनाच्या पहिल्याच दिवशी अलोट गर्दी! जुने गोवेत 1 लाख भाविक; अजून आकडा वाढणार

Ranbir Kapoor At IFFI: 'मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचंय पण..'; रणबीरने व्यक्त केली महत्वाकांक्षा; प्रेक्षकांना दिली खूशखबर

Goa Fianance Scam: गोव्यात आजवरचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा; गुंतवणुकीच्या नावाखाली 50 जणांना 130 कोटींचा गंडा

Mayem Fire Incident: वायंगिणी-मयेत आगीचा तांडव! 30 लाख रुपयांचे नुकसान; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

Cash For Job: आमच्यावर पोलिसांमार्फत पाळत! सरदेसाई, पालेकरांचा सनसनाटी आरोप

SCROLL FOR NEXT