Kenya Violence Dainik Gomantak
ग्लोबल

'या' देशात हजारो आंदोलकांनी संसदेलाच लावली आग; भारताकडून आपल्या नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी

Kenya Violence: सरकारच्या प्रस्तावित कर वाढीविरोधात केनियामध्ये हिंसक निदर्शने होत आहेत.

Manish Jadhav

सरकारच्या प्रस्तावित कर वाढीविरोधात केनियामध्ये हिंसक निदर्शने सुरु आहेत. नैरोबीमधील या हिंसाचारात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत भारताने आपल्या नागरिकांसाठी एक ॲडव्हायजरी जारी केली आहे. पूर्व आफ्रिकन देशात सरकारने प्रस्तावित केलेल्या कर वाढीविरोधातील हिंसक निदर्शनादरम्यान भारताने केनियातील आपल्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

दरम्यान, मंगळवारी हजारो लोकांनी केनियाच्या संसदेवर हल्ला केल्यावर पोलिसांनी पहिल्यांदा अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. नंतर ताबडतोब गोळीबार केला. आंदोलकांनी यादरम्यान संसदेचा काही भाग पेटवून दिला. दुसरीकडे, केनियाचे अध्यक्ष विल्यम रुटो यांनी मंगळवारी "हिंसा आणि अराजकता" पसरवण्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

भारतीय दूतावासाकडून ॲडव्हायजरी जारी

केनियातील भारतीय वाणिज्य दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या एका ॲडव्हायजरीमध्ये म्हटले की, "जोपर्यंत परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत भारतीय नागरिकांनी हिंसाचार प्रभावित भागात जाणे टाळावे. याशिवाय, भारतीय वाणिज्य दूतासावाची वेबसाइट आणि सोशल मीडिया हँडलला फॉलो करावे.''

दुसरीकडे, केनियामध्ये पोलिसांना (Police) मदत करण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. आंदोलकांना आटोक्यात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. ॲम्नेस्टी केनियासह अनेक स्वयंसेवी संस्थांनी एका संयुक्त निवेदनात म्हटले की, या हिंसक चकमकीत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

आंदोलकांनी राष्ट्राध्याक्षांवर विश्वासघात केल्याचा आरोप केला

केनियाच्या संसदेने (Parliament) कर वाढीचा प्रस्ताव मांडणारे वादग्रस्त विधेयक मंजूर केल्यानंतर राजधानी नैरोबी आणि देशभरातील इतर शहरांमध्ये लोक रस्त्यावर उतरले. आंदोलकांनी केनियाचे राष्ट्राध्यक्ष रुटो यांच्यावर जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. रुटो यांनी गरिबांना मदत करण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT