Taliban warns Pakistan Don't get involved in Afghanistan's internal issues Dainik Gomantak
ग्लोबल

तालिबानने पाकिस्तानला खडसावले,अफगाणिस्तानच्या अंतर्गत व्यवहारात पडू नका

तालिबानने (Taliban) सोमवारी खडसावले आहे की तो पाकिस्तानसह कोणत्याही देशाला अफगाणिस्तानच्या अंतर्गत व्यवहारात कुठलाच हस्तक्षेप करू देणार नाही.

दैनिक गोमन्तक

तालिबानने (Taliban) सोमवारी खडसावले आहे की तो पाकिस्तानसह (Pakistan) कोणत्याही देशाला अफगाणिस्तानच्या (Afghanistan) अंतर्गत व्यवहारात कुठलाच हस्तक्षेप करू देणार नाही. तालिबानच्या प्रवक्त्याने काबूलमध्ये (Kabul) आयएसआय (ISI) प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद आणि तालिबान नेता मुल्ला अब्दुल गनी बरदार (Abdul Ghani Baradar) यांच्यात झालेल्या बैठकीनंतर ही माहिती दिली आहे. युद्धग्रस्त देशात सरकारला अंतिम स्वरूप देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे देखील त्याच्या वतीने सांगण्यात आले आहे. (Taliban warns Pakistan Don't get involved in Afghanistan's internal issues)

दरम्यान, पाकिस्तानी गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सचे (आयएसआय) महासंचालक लेफ्टनंट जनरल हमीद गेल्या आठवड्यात एका अघोषित दौऱ्यावर काबूलला गेल्यानंतर अफगाणिस्तानच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेपाबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते.त्याच संदर्भात खामा न्यूजने वृत्त दिले की तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद म्हणाले की तालिबान पाकिस्तानसह कोणत्याही देशाला अफगाणिस्तानच्या कारभारात हस्तक्षेप करू देणार नाही.

15 ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर कब्जा केला. यानंतर, आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल हमीद हे अफगाणिस्तानला भेट देणारे पहिले उच्च पदस्थ परदेशी अधिकारी होते. सोमवारी काबूलमध्ये पत्रकार परिषद घेताना, मुजाहिद यांनी पुष्टी केली की, आयएसआय प्रमुखाने काबूल दौऱ्यादरम्यान मुल्ला बरादरची भेट घेतली होती.

मुजाहिद म्हणाला की, तालिबानने इस्लामाबादला आश्वासन दिले होते की अफगाणिस्तानचा भूभाग पाकिस्तानच्या विरोधात वापरला जाणार नाही. तत्पूर्वी, पाकिस्तानी माध्यमांनी वृत्त दिले होते की लेफ्टनंट जनरल हमीद यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ तालिबानच्या आमंत्रणावर काबूलला गेले होते.पण तालिबानने सांगितले की इस्लामाबादने या भेटीचा प्रस्ताव दिला होता. रविवारी तालिबानने सांगितले की, काबूल आणि इस्लामाबादमधील द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे प्रमुख अफगाणिस्तानात आले होते.

तालिबान सांस्कृतिक आयोगाचे उपप्रमुख अहमदुल्लाह वासिक म्हणाला की, तालिबान नेत्यांनी लेफ्टनंट जनरल हमीद यांच्याशी द्विपक्षीय संबंध आणि अफगाणिस्तान प्रवाशांना अफगाणिस्तान आणि पाकिस्तान दरम्यानच्या तोरखम आणि स्पिन बोल्डक येथे येणाऱ्या प्रवाशांच्या समस्यांविषयी चर्चा केली आहे."पाकिस्तानी अधिकारी अफगाण प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी सीमा भागात, विशेषत: तोरखाम आणि स्पिन बोल्डक येथे आले आहेत. त्यांना स्वतः काबूलला भेट द्यायची होती आणि आम्ही त्यांना सहमती दर्शवली."असे देखील अहमदुल्लाह वासिक याने सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

नवरात्र, वाघ, हिंदू आणि अभयारण्य! गोव्यात व्हिडिओवरुन वाद; सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या भाजप नेत्यावर अखेर गुन्हा

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

SCROLL FOR NEXT