Afghanistan Presidential Palace Dainik Gomantak
ग्लोबल

Taliban ने हटवला राष्ट्रपती भवनातून अफगाणिस्तानचा ध्वज

तसेच तालिबान्यांनी (Taliban) राजधानीच्या भिंतीवरील ध्वजही काढून टाकला असून त्याच्या जागी तालिबानने आपला झेंडा (Taliban Flag) फडकवला आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानचा (Afghanistan) राष्ट्रध्वज (National Flag) तालिबानने (Taliban) काबूलच्या (Kabul) राष्ट्रपती भवनातून (Presidential Palace) काढून टाकला आहे. तसेच तालिबान्यांनी राजधानीच्या भिंतीवरील ध्वजही काढून टाकला असून त्याच्या जागी तालिबानने आपला झेंडा (Taliban Flag) फडकवला आहे. अतिरेकी संघटनेने पंजशीर खोऱ्यात आपली मोहीम अधिक तीव्र केली असून प्रतिरोधक दलाच्या (Resistance forces) शीर्ष नेत्यांची हत्या केली आहे. त्याचवेळी तालिबानने पंजशीर खोऱ्यावर (Panjshir Valley) ताबा मिळवल्याचाही दावा केला आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव ओळख गुप्त ठेवत प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हजारो तालिबानी रात्रभर कारवाई करत पंजशीरचे आठ जिल्हे काबीज केले. तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद (Zabiullah Mujahid) यांनी सोमवारी एक निवेदन जारी करून पुष्टी केली की, पंजशीर आता तालिबान लढाऊंच्या ताब्यात आहे. "आम्ही चर्चेद्वारे समस्या सोडवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला परंतु त्यांनी बोलण्यास नकार दिला, त्यानंतर आम्ही सेनानी पाठवले," आणि त्यानंतर मुजाहिद यांनी काबूलमध्ये पत्रकार परिषदेत यासंबंधी सांगितले.

लोक देश सोडू पाहत आहेत

तालिबानविरोधी लढवय्यांचे नेतृत्व माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह (Amrullah Saleh) आणि अहमद शाह मसूद यांचे पुत्र अहमद मसूद (Ahmad Massoud) करत आहेत. तालिबानच्या विरोधात दीर्घकालीन भूमिका घेण्याची तज्ज्ञांना भीती होती, ज्यांना 20 वर्षांपासून युद्धग्रस्त देशात अमेरिकेच्या उपस्थितीच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रतिकार केला. अफगाणिस्तानातील बऱ्याच अफगाण नागरिकांना देश सोडण्याच्या विचारात आहेत. परंतु काबूल विमानतळावरून (Kabul Airport) आंतरराष्ट्रीय उड्डाणे अद्याप सुरु झालेली नाहीत.

अहमद मसूदने संघर्ष संपवण्याचे आवाहन केले होते

तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, तालिबान लढाख्यांना पंजशीरचा भौगोलिक विचार करता त्यांच्या ताब्यात हा भाग येणे संभवता:हा कठीण आहे. विशाल हिंदुकुश पर्वतांमध्ये वसलेल्या, पंजशीर खोऱ्याला फक्त एकच अरुंद प्रवेशद्वार आहे. 1980 च्या दशकात सोवियत संघाला हुसकावून लावण्यात स्थानिक पंजशीर लढवय्यांना यश आले होते. आता एक दशकानंतर मसूदच्या नेतृत्वाखालील लढवय्यांनी तालिबानला नाकीनऊ आणले. मसूदचा मुलगा अहमद याने रविवारी एका निवेदनात अलीकडच्या काही दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्याचे आवाहन केले. तालिबानने आपले हल्ले थांबवण्यास सहमती दर्शविली तर आपले सैन्य शस्त्रे सोडतील असं त्यांनी यावेळी सांगितले. तालिबान लढाख्यांना घेऊन जाणारी अनेक वाहने रविवारी रात्री पंजशीर खोऱ्यात प्रवेश करताना दिसली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT