Taliban Dainik Gomantak
ग्लोबल

‘तालिबानने आश्वासनांचे पालन करावे’ UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात भीम गर्जना!

संयुक्त राष्ट्र (UN) मध्ये भारताने (India) पुन्हा एकदा अफगाणिस्तानमधील (Afghanistan) दहशतवादाचा (Terrorism) मुद्दा उपस्थित केला आहे.

दैनिक गोमन्तक

संयुक्त राष्ट्र (UN) मध्ये भारताने (India) पुन्हा एकदा अफगाणिस्तानमधील (Afghanistan) दहशतवादाचा (Terrorism) मुद्दा उपस्थित केला आहे. तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानची भूमी दहशतवादासाठी वापरली जाणार नाही या आपल्या वचनावर ठाम राहणे अत्यावश्यक असल्याचे भारताने गुरुवारी सांगितले. या व्यतिरिक्त, भारताने आशा व्यक्त केली आहे की, तालिबानच्या राजवटीत अफगाण लोक कोणत्याही निर्बंधाशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवास करु शकतील. तालिबानने अलीकडेच अफगाणिस्तानमध्ये आपले अंतरिम सरकार स्थापन केले. विशेष बाब म्हणजे या काळजीवाहू सरकारमध्ये अनेक मंत्री हे दहशतवादी म्हणून नियुक्त केले जातात.

संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी 30 ऑगस्टच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाचा पुनरुच्चार करत, ज्यात म्हटले आहे की, अफगाणिस्तानचा वापर कोणत्याही देशाला धमकावण्यासाठी किंवा हल्ला करण्यासाठी, दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी आणि दहशतवादी कारवायांसाठी करण्यात येऊ नये. तसेच षड्यंत्र करण्यासाठी किंवा त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर आम्ही कदापी करु देणार नाही. संयुक्त राष्ट्र संघात दहशतवादाच्या मुद्दा भारताने सातत्याने उपस्थित केला आहे.

तिरुमूर्ती म्हणाले, "आमच्या दहशतवादासंबधी अनेक सामूहिक चिंता आहेत. विशेषतः दहशतवादाच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय समुदयाने गंभीर विचार केला पाहिजे." त्याचबरोबर तालिबानने अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवाद पसरविण्यासाठी करु नये. शिवाय ठरावीक दहशतवादी आणि दहशतवादी गटांचा समावेश संयुक्त राष्ट्राच्या 1267 ठराव अंतर्गत आहे. त्यामुळे या संदर्भात दिलेल्या आश्वासनांचा आदर करुन त्याचे पालन केले पाहिजे.

भारताच्या अध्यक्षतेखाली स्वीकारलेल्या ठरावात तालिबानचे नाव समाविष्ट करण्यात आला असून दहशतवादावरील आश्वासनाचा समावेश करण्यात आला आहे. यासह तालिबानच्या वक्तव्याचाही उल्लेख होता, ज्यात असे म्हटले जात होते की, अफगाण कोणत्याही निर्बंधाशिवाय परदेश प्रवास करु शकतील. भारतीय बाजूने म्हटले आहे, "आम्हाला आशा आहे की, या वचनांचे पालन केले जाईल, ज्यात अफगाण आणि परदेशी नागरिकांच्या सुरक्षित निर्गमनचा समावेश आहे."

टीएस तिरुमूर्ती पुढे म्हणाले, “अफगाणिस्तानमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तसेच देशातील अल्पसंख्यांकांच्या हितांचे रक्षण करण्याविषयी देखील ते यावेळी बोलले. त्याचबरोबर संयुक्त राष्ट्रांपर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, "अफगाणिस्तानच्या भविष्याबद्दल बरीच अनिश्चितता आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT