Taliban Government despite women's for back to the work  Dainik Gomantak
ग्लोबल

तालिबान्यांचा 'महिला द्वेष', कामावर परतण्यासही बंदी !

तालिबान (Taliban) आता अफगाणिस्तानच्या (Afghanistan) माजी सरकारमध्ये सेवा करणाऱ्या महिलांना (Afghan Women's) कामावर परतण्यापासून जबरदस्तीने रोखत आहे.

दैनिक गोमन्तक

तालिबान (Taliban) आता अफगाणिस्तानच्या (Afghanistan) माजी सरकारमध्ये सेवा करणाऱ्या महिलांना (Afghan Women's) कामावर परतण्यापासून जबरदस्तीने रोखत आहे. आता महिलांना सरकारकडून कामावर परतण्याचा देखील हक्क मागावा लागत आहे. भारतातील कायदा पदवीधर शगुफा नजीबी यांनी सांगितले की, ती दहा वर्षांपासून अफगाणिस्तानच्या संसदेत काम करत आहे. जेव्हा ती कामावर परतली तेव्हा तिला धमकी देण्यात आली आणि ती परत घराकडे फिरली.(Taliban Government despite women's for back to the work)

अफगाणिस्तान सरकारच्या आकडेवारीनुसार पाच हजारांहून अधिक महिला लष्करी क्षेत्रात काम करतात. नोकरदार महिलांना आता घरीच राहण्याचे आदेश दिले जात आहेत. तालिबानने केवळ आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातीळ महिलांनाच कामावर परतण्याची परवानगी दिली आहे.

त्याचवेळी काबूलमधील माजी पोलीस अधिकारी हनीफा हमदार म्हणतात की, अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार सत्तेवर आल्यापासून तिला तिच्या भविष्याची चिंता आहे. त्या म्हणाल्या , 'मी विधवा आहे. मला चार मुले आहेत. जर मी कामावर गेले नाही तर मी जेवणाची व्यवस्था कशी करू शकेन? '

सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर लिमा मोहम्मदी म्हणतात, रुग्णालयात आणि इतरत्र महिलांची गरज आहे. जसे पुरुष काम करतात, महिलांनीही काम केले पाहिजे. टोलोन्यूजच्या अहवालानुसार, गेल्या तीन महिन्यांपासून पगार न मिळता देखील त्यांनी पुन्हा काम सुरू केले आहे.

तालिबानने सरकार स्थापनेवेळी आश्वासन दिले होते की तालिबानचे नवीन सरकार अधिक उदारमतवादी असेल, परंतु तालिबान नेत्यांनी महिलांचे हक्क परत घेतले जाणार नाहीत याची हमी देण्यास नकार दिला होता . सुधारणा आणि नागरी सेवा आयोगाच्या (आरसीएससी) आकडेवारीनुसार, मागील सरकारमध्ये सुमारे 120,000 महिला नागरी संस्थांमध्ये काम करत होत्या. सरकारमध्ये सेवा देणाऱ्या महिलांबाबत नवीन सरकार कसे निर्णय घेईल हे अद्याप अस्पष्टच आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT