Taliban behead Women volleyball player named Mahjabin Hakimi Dainik Gomantak
ग्लोबल

तालिबान्यांच्या क्रूरतेचा कळस,महिला खेळाडूचा शिरच्छेद

काबुलमध्ये अफगाणिस्तानच्या कनिष्ठ महिला व्हॉलीबॉल संघाच्या खेळाडू महजबीन हकीमीचा तालिबान्यांनी शिरच्छेद करता त्या महिला खेळाडूची हत्या केली आहे .

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानची (Afghanistan) सत्ता जबरदस्तीने ताब्यात घेणाऱ्या तालिबानच्या (Taliban) क्रूरतेचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे . काबुलमध्ये (Kabul) अफगाणिस्तानच्या कनिष्ठ महिला व्हॉलीबॉल संघाच्या खेळाडू महजबीन हकीमीचा (Mahjabin Hakimi) तालिबान्यांनी शिरच्छेद करता त्या महिला खेळाडूची हत्या केली आहे . अफगाणिस्तान राष्ट्रीय महिला व्हॉलीबॉल संघाचे (Afghanistan Women's Volleyball Team ) प्रशिक्षक सुरैया अफझलीने पर्शियन इंडिपेंडंटशी केलेल्या संभाषणात खेळाडूच्या हत्येची पुष्टी केली आहे. (Taliban behead Women volleyball player named Mahjabin Hakimi)

तालिबानच्या क्रूरतेबद्दल माहिती देताना टीमच्या प्रशिक्षक सुरैया यांनी सांगितले की, मेहजाबीनच्या कुटुंबातील सदस्यांशिवाय तिची हत्या कधी आणि कशी झाली हे कोणालाही ठाऊक नाही. अफगाणिस्तानातील तत्कालीन सरकार जाण्यापूर्वी मेहजाबीन काबुल महानगरपालिका व्हॉलीबॉल क्लबकडून खेळली. या अहवालात सुरैयाचे म्हणणे आहे की, मेहजबीनला कदाचित ऑक्टोबरच्या सुरुवातीला फाशी देण्यात आली होती. तालिबानी दहशतवाद्यांच्या धमकीमुळे मेहजबीनच्या कुटुंबीयांनी कोणालाही काहीही सांगितले नाही.

अफगाणिस्तानात तालिबानच्या आगमनानंतर महिला खेळाडूंच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे, याकडेही सुरैया यांनी लक्ष वेधले. तालिबानी दहशतवादी महिला खेळाडूंचा शोध घेत आहेत आणि त्यांची घरे शोधत आहेत. तालिबानकडून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या आणि माध्यमांमध्ये दिसणाऱ्या महिला खेळाडूंना सर्वाधिक धोका आहे असे देखील सांगण्यात आले आहे . प्रशिक्षकाने संघाला सांगितले की, महिला व्हॉलीबॉल संघातील केवळ दोन सदस्यांनीच अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यात यश मिळवले आहे.

मात्र टीमचे उर्वरित खेळाडू अफगाणिस्तानात आहेत आणि त्यांचा जीव वाचवण्यासाठी ते लपून बसले आहेत. तालिबानचा महिलांच्या स्वातंत्र्याला तीव्र विरोध आहे तालिबान महिला स्वातंत्र्याचा कट्टर विरोधक आहे. अगदी 20 वर्षांपूर्वी जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली होती , तेव्हा देखील सर्वात जास्त त्रास स्त्रियांनाच झाला होता. आता पुन्हा एकदा महिलांवर अत्याचार होत आहेत. तालिबानने महिलांचा समावेश असलेल्या सर्व प्रकारच्या खेळांवर बंदी घातली आहे. तालिबानने महिलांना काम करण्यासही बंदी घातली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa CM Helpline: तुमच्या तक्रारी थेट CM सावंत ऐकणार, एका फोनवर प्रश्न सुटणार; 24x7 नागरिकांसाठी 'मुख्यमंत्री हेल्पलाईन' सुरू

Bonderam: 'दिवाडी बेट' सजले! ‘बोंदेरा’ उत्साहात साजरा; सामुदायिक एकतेचे आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन

Salvador Do Mundo: साल्वादोर द मुंदचे ग्रामस्थ आक्रमक! कचरा, मैदानाची दुरवस्था, अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर

Bhoma: 'मातीच्या भरावामुळे गाव धोक्यात'! भोम ग्रामसभेत संताप; चौपदरी रस्त्याचा प्रश्‍नही चर्चेत

Goa Live News: गोव्यातील फसवणूक प्रकरणात सिंगापूरच्या रहिवाशाला अटक!

SCROLL FOR NEXT