Taliban Dainik Gomantak
ग्लोबल

"तालिबान ISI चे कठपुतळे"; पेंटॉगॉनच्या माजी अधिकाऱ्याचं मोठं वक्तव्य

पाकिस्तानी (Pakistan) गुप्तचर संस्थेचे प्रमुख फैज हमीद (ISI Chief Faiz Hameed) काबूलच्या आपात्कालीन दौऱ्यावर आले आहेत.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमधील (Afghanistan) अशरफ घनी (Ashraf Ghani) यांचे सरकार तालिबान्यांनी उलथवून टाकत सत्ता आपल्या ताब्यात घेतली आहे. आता मात्र तालिबान (Taliban) आणि हक्कानी नेटवर्क (Haqqani Network) यांच्यात सत्ता स्थापनेसाठी संघर्ष सुरु झाला आहे. पाकिस्तान प्रणित हक्कानी नेटवर्कचे आफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन व्हावी यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे. त्यामुळे पाकिस्तानी (Pakistan) गुप्तचर संस्थेचे प्रमुख फैज हमीद (ISI Chief Faiz Hameed) काबूलच्या आपात्कालीन दौऱ्यावर आले आहेत.

अहवालानुसार, हमीद तालिबान आणि हक्कानी नेटवर्क यांच्यामध्ये निर्माण झालेल्या अंतर्गत यादवीवर निराकरण करण्यासाठी आले आहेत. ज्यामध्ये या गटांमध्ये संघर्ष झाल्याचे आणि तालिबानचे सहसंस्थापक मुल्ला अब्दुल गनी बरदार जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अमेरिकन एंटरप्रायजेस इन्स्टिट्यूटचे रेजिडेंट स्कॉलर मायकेल रुबिन (Michael Rubin) यांनी अमेरिकास्थित 19FortyFive मध्ये लिहिले की, तालिबान आयएसआयची कठपुतळी असल्याचे सिद्ध होते. 15 ऑगस्ट रोजी काबूलवर ताबा मिळवलेल्या तालिबानने अफगाणिस्तानात सरकार स्थापनेच्या घोषणेला बरेच दिवस विलंब केला आहे. याबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आले नसले तरी तालिबान आणि हक्कानी नेटवर्क यांच्यात सत्तेसाठी मतभेद असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे, ज्यामुळे सरकार स्थापनेला विलंब होत आहे.

तालिबानचे प्रमुख नेते मुल्ला अब्दुल गनी बरदार (Mulla Abdul Gani Bardar), जे अफगाणिस्तानच्या नवीन राजवटीचे नेतृत्व करणार आहेत, ते संघर्षाच्या वेळी जखमी झाले असून त्यांच्यावर पाकिस्तानात उपचार सुरू आहेत. रुबिनने तालिबानमध्ये फूट पडण्याचे संकेत दिले असून ते म्हणाले की, हक्कानी आणि इतर अनेक गट हैबतुल्लाह अखुंदजादा यांना त्यांचा नेता म्हणून स्वीकारत नाहीत. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद शनिवारी एका शिष्टमंडळासह काबूलला पोहोचले.

दरम्यान, पेंटागॉनच्या एका माजी अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीमुळे अफगाणिस्तान सरकार पाडण्यात आयएसआय प्रमुख हमीद यांचा हात असल्याचे उघड झाले आहे. ते पुढे म्हणाले, "अमेरिकन धोरण निर्मात्यांनी तालिबानशी का बोलावे किंवा हमीदचा हात उघडकीस आल्यानंतर हमीद यांची तातडीची काबूल भेट ही पुष्टी करते की, तालिबान केवळ आयएसआयची बाहुले आहे." वॉशिंग्टनसाठी एक चांगला मार्ग म्हणजे फैज हमीदला दहशतवादी म्हणून घोषित करणे, आणि ते ज्या संघटनेचे नेतृत्व करतात ते संघटनेलाही दहशतवादी म्हणून घोषित करणे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, पाकिस्तानचा अफगाणिस्तान सरकार पाडण्यात आणि तालिबानला निर्णायक शक्ती म्हणून स्थापित करण्यात महत्त्वाचा वाटा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT