Tajikistani People Dainik Gomantak
ग्लोबल

Russia: ताजिकिस्तानी लोक सोडतायेत रशिया; मॉस्कोतील कॉन्सर्ट हॉल हल्ल्याशी काय संबंध आहे?

Tajikistani citizens leaves Russia: एका आठवड्यापूर्वी या बंदूकधाऱ्यांनी कॉन्सर्ट हॉलवर हल्ला केला, रशियाच्या दोन दशकांतील सर्वात मोठ्या हल्ल्यात 144 लोक मारले गेले.

दैनिक गोमन्तक

Tajikistani citizens leaves Russia

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेललं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. मागील काही दिवसांपासून रशियाने युक्रेनविरद्ध सुरु असलेली लढाई अधिक तीव्र केली आहे. रशिया सातत्याने युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ले करत आहे. यातच दुसरीकडे, रशियात राहणाऱ्या ताजिकिस्तानी स्थलांतरितांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दररोज हजारो ताजिकिस्तानी नागरिक रशिया सोडून जात आहेत. याचे कारण म्हणजे इस्लामिक स्टेटने नुकताच मॉस्कोजवळील एका कॉन्सर्ट हॉलवर केलेला हल्ला. या हल्ल्याप्रकरणी रशियाने अटक केलेले चार संशयित मूळचे ताजिकिस्तानचे आहेत. हे सर्वजण कामानिमित्त ताजिकिस्तानमधून रशियात आले होते. यादरम्यान ते इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आले. पैशांसाठी त्यांनी हल्ला केला. एका आठवड्यापूर्वी या बंदूकधाऱ्यांनी कॉन्सर्ट हॉलवर हल्ला केला, रशियाच्या दोन दशकांतील सर्वात मोठ्या हल्ल्यात 144 लोक मारले गेले.

ताजिकिस्तानी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 22 मार्च रोजी मॉस्कोजवळील कॉन्सर्ट हॉल हल्ल्यात डझनभर लोक ठार झाल्यानंतर रशियातून ताजिकिस्तानला जाणाऱ्या स्थलांतरित कामगारांमध्ये वाढ झाली आहे. आम्हाला खूप कॉल येतात. ते तक्रार करत नाहीत, पण आमच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत." ताजिकिस्तानने या आठवड्यात झालेल्या सामूहिक गोळीबाराशी आणि या आठवड्यात जबाबदारी स्वीकारणाऱ्या दहशतवादी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन नऊ जणांना ताब्यात घेतले आहे, असे ताजिक सुरक्षा सूत्राने सांगितले.

नॅशनल असोसिएशन ऑफ बिल्डर्स (NOSTROY) चे अध्यक्ष अँटोन ग्लुशकोव्ह यांनी शुक्रवारी इंटरफॅक्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, स्थलांतरित कामगारांनी देश सोडल्यामुळे रशियाला मोठा फटका बसू शकतो. 2022 च्या तुलनेत यावर्षी बांधकाम उद्योगातील तोट्यात 36 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रशियन सेंट्रल बँकेने म्हटले की, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि परिणामी वेतन वाढ हे महागाईच्या जोखमींपैकी एक होते ज्यामुळे व्याजदर उच्च ठेवण्यास भाग पाडले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चांदीच्या जोडव्यांसाठी 65 वर्षीय महिलेचे कापले पाय, पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या; राजस्थानातील थरकाप उडवणारी घटना VIDEO

Horoscope: नशीब चमकणार! 'कर्क-मिथुन'सह 4 राशींना मिळणार दुप्पट लाभ, पाहा तुमची रास आहे का?

India Afghanistan Relations: भारतीयांसाठी अफगाणिस्तानचे दार खुले, तालिबानी नेत्यानं दिली ऑफर; पाकिस्तानातील दहशतवादावरही स्पष्ट केली भूमिका VIDEO

सूर्यकुमार यादवला धक्का! मुंबई संघातून पत्ता कट, नेतृत्वाची कमान 'या' खेळाडूच्या हाती

Devachi Punav: तरंगांची होणारी शारदीय चंद्रकळेच्या आल्हाददायक प्रकाशातली भेटाभेट, ‘देवाची पुनाव'

SCROLL FOR NEXT