Taiwan Parliament Video Dainik Gomantak
ग्लोबल

Taiwan Parliament Video: तैवानची संसद बनली ‘आखाडा’, नव्या प्रस्तावावरुन खासदारांमध्ये हाणामारी; एकमेकांना घातल्या लाथा-बुक्क्या

Taiwan Parliament Video: तैवानच्या संसदेत शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. खासदारांनी एकमेकांना धक्काबुक्की केली.

Manish Jadhav

Taiwan Parliament Video: तैवानच्या संसदेत शुक्रवारी मोठ्या प्रमाणावर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले. खासदारांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकारच्या कृतींवर लक्ष ठेवण्यासाठी खासदारांना अधिक अधिकार देण्याच्या प्रस्तावावर संसदेत चर्चा सुरु असतानाच खासदारांमध्ये हाणामारी सुरु झाली. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये खासदार फायली हिसकावून संसदेबाहेर पळताना दिसत आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, काही खासदार स्पीकरच्या आसनाभोवती फिरताना दिसत होते, अनेकजण टेबलावर उड्या मारत होते.

दरम्यान, सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून लोकांनी ही संसद नसून अखाडा असल्याचे म्हटले. अनेक खासदारांनी एकमेकांना लाथा बुक्क्या मारल्या. दुपारपर्यंत संसदेत हा गोंधळ पाहायला मिळाला, असे रिपोर्टमध्ये म्हटले. निर्वाचित अध्यक्ष लाइ चिंग-टे संसदेत बहुमताशिवाय सोमवारी पदभार स्वीकारण्यापूर्वी हा राजकीय गोंधळ पाहायला मिळाला. एका व्हिडिओमध्ये खासदार एकमेकांना धक्काबुक्की करताना स्पष्टपणे दिसत आहेत. डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (डीपीपी) आणि कुओमिंतांग (केएमटी) पार्टीचे खासदार एकमेकांसमोर आले.

संसदेत बहुमत गमावले

खासदारांचा सभागृहात प्रवेश करण्यापूर्वीच वाद तापला होता. खासदारांनी सभागृहाबाहेरच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु केले होते. दुसरीकडे, नवीन सरकारची स्थापना आधीच वादात आहे, कारण जानेवारीमध्ये निवडणुका जिंकूनही लाइ यांच्या डीपीपी पक्षाने संसदेत आपले बहुमत गमावले आहे. विरोधी केएमटीकडे डीपीपीपेक्षा जास्त जागा आहेत, परंतु बहुमतासाठी पुरेशा नाहीत, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. संसदेच्या 113 पैकी आठ जागांवर नियंत्रण ठेवणाऱ्या TPP सोबत ते युती करण्याच्या प्रयत्नात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sheikh Hasina: फाशीच्या शिक्षेनंतर शेख हसीना यांना कोर्टाचा मोठा झटका, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सुनावली 21 वर्षांची शिक्षा; अवामी लीगचा राजकीय षडयंत्राचा आरोप

Goa Cabinet Decision: खाण व्यवसायाला दिलासा! ट्रकसाठी रस्ता कर सवलत आता 2027 पर्यंत वाढवली; वाचा गोवा मंत्रिमंडळाचे तीन महत्त्वाचे निर्णय

Pooja Naik: 'पूजा नाईकच्या आरोपांना पुरावा मिळेना', DGP आलोक कुमार यांचा खुलासा; प्रकरणाचा तपास थंडावणार?

अग्रलेख: गोव्यात गुन्हा करा, 'बिनधास्त पसार' व्हा! सुरक्षा यंत्रणांना जाग येण्यापूर्वीच गुन्हेगार गायब

Goa Politics: 'शांत राहा! आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात', मनोज परब यांचा दावा, कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन; Watch Video

SCROLL FOR NEXT