Taiwan-China Clash: Taiwan warns China for war preparing situation  Dainik Gomantak
ग्लोबल

Taiwan-China Clash: तैवान चा 'ड्रॅगन' ला इशारा

जर चिनी सैन्याने त्यांच्या देशावर हल्ला केला तर त्या युद्धाला जशास तसे उत्तर दिले जाईल.असा इशारा तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला दिला आहे.(Taiwan-China Clash)

दैनिक गोमन्तक

तैवान आणि चीनमधील तणाव (Taiwan-China Clash) सध्या अधिकच वाढताना दिसत आहे.त्यातच आता तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी (Taiwan Foreign Minister) एका मुलाखतीत चीन (China) करत असलेल्या कुरघोड्याबद्दल इशारा दिला आहे. जर चिनी सैन्याने त्यांच्या देशावर हल्ला केला तर त्या युद्धाला जशास तसे उत्तर दिले जाईल.असा इशारा तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला दिला आहे. (Taiwan-China Clash: Taiwan warns China for war preparing situation)

ऑस्ट्रेलियाच्या वृत्तवाहिनी एबीसी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत तैवानचे परराष्ट्र मंत्री जोसेफ वू यांनी इशारा दिला आहे की चीनसोबत युद्धाचा धोका आहे. "तैवानचे संरक्षण आमच्या हातात आहे आणि आम्ही त्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत," त्याचबरोबर . "मला खात्री आहे की जर चीनने तैवानवर हल्ला केला तर त्यांना खूप त्रास सहन करावा लागेल."

विशेष म्हणजे, चीनने अलीकडेच तैवानच्या आसपासच्या सीमेवर आपल्या लष्करी कारवाया वाढवलेल्या पाहायला मिळाल्या आहेत , ज्यामुळे या भागात मोठ्या चिंतेचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) 120 हून अधिक विमान तैवानमधील हवाई संरक्षण क्षेत्रावर उडताना दिसले. गेल्या शनिवारी चीनचा राष्ट्रीय दिवस होता. त्याच दिवशी 39 PLA विमानांनी तैवान परिसरावरून उड्डाण केले होते . यामध्ये अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम लढाऊ विमानांचा समावेश होता. तैवान व्यतिरिक्त अमेरिकेनेही या घटनेचा निषेध केला होता.

सोमवारी, तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, 50 हून अधिक पीएलए विमाने त्यांच्या हद्दीत दाखल झाली होती , ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई होती . पीएलए विमाने तैवान देशाच्या सीमेपासून 200 ते 300 किलोमीटरवर पोहोचली होती, जे तैपेईसाठी त्रासदायक आहे. तैवानने अनेकवेळा म्हटले आहे की त्याला चीनच्या हल्ल्याची भीती वाटते.

दरम्यान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानवर कब्जा करणे म्हणजे असह्य असल्याचे म्हटले आहे. यासोबतच चीनने आपली लष्करी आणि मुत्सद्दी तयारीही वाढवली आहे. शुक्रवारी जेव्हा चीनचा राष्ट्रीय दिवस होता, त्यावेळी चीनने तैवानच्या दिशेने एकापाठोपाठ अनेक युद्ध विमाने पाठवली होती. शुक्रवारपासून सुमारे 150 लढाऊ विमाने चीनमधून तैवानला पाठवण्यात आली आहेत. तैवानचे राष्ट्रपती त्साई इंग यांनी चीनला इशारा दिला आहे की जर चीनने तैवानच्या बेटाला जोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम खूप वाईट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT