Israeli Airstrike Dainik Gomantak
ग्लोबल

Israeli Airstrike: तुर्कीयेनंतर इस्त्रायलचा सीरियावर हवाई हल्ला, जीवित आणि मालमत्तेचे मोठे नुकसान; अनेक लोक मारले गेले

Israeli Airstrike: सोमवारी पहाटे सीरियातील अलेप्पो शहरावर इस्रायलकडून भीषण हवाई हल्ले करण्यात आले. इस्रायलने केलेल्या या हवाई हल्ल्यांमध्ये अनेक लोक मारले गेले आहेत.

Manish Jadhav

Israeli Airstrike: एकीकडे इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु असतानाच दुसरीकडे सोमवारी पहाटे सीरियातील अलेप्पो शहरावर इस्रायलकडून भीषण हवाई हल्ले करण्यात आले. इस्रायलने केलेल्या या हवाई हल्ल्यांमध्ये अनेक लोक मारले गेले आहेत.

सीरियाच्या सरकारी माध्यमांनी हा दावा केला आहे. सरकारी वृत्तसंस्था 'साना'ने सांगितले की, हे हल्ले अलेप्पोच्या दक्षिण-पूर्व भागात झाले. मात्र, त्यांनी मृतांचा आकडा उघड केला नाही. एजन्सीने सांगितले की, "या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे."

इस्रायलने हल्ले तीव्र केले

दरम्यान, 2011 पासून इस्त्रायली सैन्याने सीरियामध्ये अनेक हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये लष्कराच्या चौक्या आणि इराण (Iran) समर्थित सैनिकांना विशेषतः लक्ष्य करण्यात आले आहे. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला, त्यानंतर इस्त्रायलकडून हल्ले सुरु झाले जे आजतागायत सुरु आहेत.

इराणच्या दूतावासाजवळ हवाई हल्ला झाला

दुसरीकडे, 1 एप्रिल रोजी इस्रायलने सीरियाची (Syria) राजधानी दमास्कस येथील इराणी दूतावासाजवळ हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला इतका भीषण होता की, एक इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. या हल्ल्यात इराणच्या कुड्स फोर्सचे दोन टॉप कमांडर आणि इतर 5 अधिकारीही मारले गेले होते.

मृतांमध्ये इराणचे सीरियातील सर्वात वरिष्ठ अधिकारी मोहम्मद रजा जाहेदी आणि त्यांचा डेप्युटी कमांडर मोहम्मद हज रहीमी यांचा समावेश होता.

दरम्यान, तुर्कीयेनेही उत्तर सीरियामध्ये ड्रोन हल्ला केला. तुर्कीयेने शुक्रवारी संध्याकाळी हा हल्ला केला. या ड्रोन हल्ल्यात अमेरिका समर्थित चार सैनिक ठार झाले. तर 11 नागरिक जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT