Swedish Embassy Iraq Dainik Gomantak
ग्लोबल

Swedish Embassy Video: स्वीडनच्या दूतावासावर इराकमध्ये हल्ला; कुराणच्या आपमानाचा घेतला बदला

Ashutosh Masgaunde

Protesters in Iraq storm Swedish Embassy: इराकच्या बगदादमध्ये जमलेल्या नागरिकांनी गुरुवारी सकाळी स्वीडनच्या दूतावासावर हल्ला केला. एवढेच नाही तर जमावाने दूतावासही पेटवून दिला.

वृत्तसंस्था रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने या घटनेची माहिती दिली. या हल्ल्यात दूतावासातील कर्मचार्‍यांना कोणतीही इजा झाली नसली तरी अधिक माहिती देण्यात आली नसल्याचं सांगण्यात येत आहे.

शिया धर्मगुरू मुक्तादा सदर यांच्या समर्थकांनी केलेल्या निदर्शनेनंतर दूतावासावर हा हल्ला झाल्याचे सांगण्यात आले.

स्वीडनमध्ये मुस्लिमांचा पवित्र धर्मग्रंथ कुराण जाळल्याच्या विरोधात सदरचे समर्थक निदर्शने करत होते.

विशेष म्हणजे स्वीडनमध्ये कुराण जाळण्याच्या घटनेवर अनेक इस्लामिक देशांनी यापूर्वीच टीका केली आहे.

'वन बगदाद', या लोकप्रिय इराकी टेलिग्राम चॅनेल जे मुक्तदा समर्थक चालवतात, त्याने बुधवारी रात्री (सुमारे 1 वाजेच्या सुमारास) स्वीडिश दूतावासाबाहेर जमलेल्या गर्दीचे अनेक व्हिडिओ पोस्ट केले.

यामध्ये काही लोक दूतावासात घुसतानाही दिसले. व्हिडिओमध्ये काही वेळाने दूतावासाच्या आवारातून धुराचे लोट उठताना दिसत आहेत.

मात्र, या व्हिडिओंची पडताळणी होऊ शकली नाही. हल्ल्याच्या वेळी दूतावासात किती लोक उपस्थित होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पार्श्वभूमी

जून महिन्याच्या अखेरीस स्वीडन या देशात मशिदीबाहेर कुराण जाळण्यात आले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक आंदोलक कुराण फेकताना, ते जाळताना आणि स्वीडिश ध्वज फडकावताना दिसत होता.

आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे कुराण जाळण्याच्या घटनेवर स्वीडन सरकारने आंदोलकावर कोणतीही कारवाई केली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

Mhadei Water Dispute: 'म्हादई'बाबत चुकीची माहिती नको! नेरसे येथे जलवाहिनीचे काम सुरु नाही

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

SCROLL FOR NEXT