Sweden Quran burning Dainik Gomantak
ग्लोबल

Sweden Quran Burning: तरुणाने जाळले मशिदीसमोर कुराण; सरकार म्हणते, हे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य

Salwan Momika: स्वीडनमध्ये एका मशिदीसमोर तरूणाने कुराण जाळले. या घटनेविरोधात इस्लामिक देशांमध्ये निदर्शने सुरू झाली आहेत. तुर्की, सौदी अरेबिया, यूएई आणि पाकिस्तानसह सर्व देश निषेध नोंदवत आहेत.

Ashutosh Masgaunde

Man tears up, burns Quran outside mosque: इस्लामिक अनुयायांचा पवित्र ग्रंथ कुराण जाळल्याची घटना घडल्याने इंटरनेटवरील वातावरण तापलेले दिसत आहे. युरोपातील स्वीडन या देशात मशिदीबाहेर कुराण जाळण्यात आले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक आंदोलक कुराण फेकताना, ते जाळताना आणि स्वीडिश ध्वज फडकावताना दिसत आहे.

आश्‍चर्याची बाब म्हणजे कुराण जाळण्याच्या घटनेवर स्वीडन सरकारने आंदोलकावर कोणतीही कारवाई केली नाही, उलट सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला दिला.

या घटनेनंतर ज गभरातील इस्लाम धर्माचे अनुयायी सोशल मीडियावर निषेध करत आहेत.

स्वीडनमधील स्टॉकहोम सेंट्रल मशिदीसमोर सलवान मोमिका या तरुणाने कुराण जाळले.

"अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे, हा तर गुन्हा"

प्रथम, तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले. तुर्कस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्वीडनमध्ये कुराण जाळणे हा गुन्हा असल्याचे म्हटले आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणीही इस्लामविरोधी निदर्शने करू शकत नाही. आम्ही हे सहन करणार नाही. जर एखाद्या देशाला नाटोमध्ये सामील होऊन आमचा मित्र बनायचे असेल तर त्याने इस्लामोफोबिया पसरवणाऱ्यांना नियंत्रणात ठेवावे लागेल.
हकान फिदान, परराष्ट्र मंत्री, तुर्की

मोरोक्कोने आपले राजदूत परत बोलावले

तुर्कीशिवाय मुस्लिम बहुल देश मोरोक्कोनेही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. कुराण जाळण्याच्या घटनेच्या निषेधार्थ मोरोक्कोने स्वीडनमधून आपले राजदूत परत बोलावले आहेत.

मोरोक्कन परराष्ट्र मंत्रालयाने स्वीडिश राजनैतिक अधिकारी यांनाही बोलावले आणि सांगितले की अशा घटना सहन केल्या जाऊ शकत नाहीत.

या घटनेविरोधात इस्लामिक देशांमध्ये निदर्शने सुरू झाली आहेत.

"मुस्लिमांच्या भावना भडकवल्या"

या घटनेवर मुस्लिम वर्ल्ड लीगचे वक्तव्य आले आहे. लीगकडून निवेदनाद्वारे या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. लीगचे सरचिटणीस शेख मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-इसान म्हणाले की, हे घृणास्पद कृत्य मुस्लिमांच्या भावना भडकवणारे आहे. दोषींना त्वरित शिक्षा झाली पाहिजे.

स्टॉकहोम सेंट्रल मशिदीसमोरील घटना

ही घटना स्वीडनमधील स्टॉकहोम सेंट्रल मशिदीसमोर घडली, जिथे बुधवारी एका ३७ वर्षीय व्यक्तीने कुराण फाडून पेटवून दिले.

हा प्रकार शेकडो लोकांच्या उपस्थितीत करण्यात आला, त्यापैकी बरेच जण कुराण जाळण्याचे समर्थन करत होते.

सीएनएनच्या मते, अभिव्यक्ती स्वातंत्र्याअंतर्गत स्वीडन सरकारने एक दिवसीय निदर्शनासाठी ही परवानगी दिली होती.

त्याचवेळी स्वीडनच्या पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध वाढला आहे. ते म्हणाले- यासंदर्भात कारवाई करण्याचा निर्णय पोलिस घेतील.

इराकी निर्वासिताचा घटनेत सहभाग

सलवान मोमिका असे नाव असलेल्या तरुणाने हा प्रकार केला. सेंट्रल मशिदीबाहेर पोलिस अधिकाऱ्यांच्या मागे तो दोन स्वीडिश ध्वज फडकवत दिसला. त्यावेळी स्वीडनचे राष्ट्रगीत वाजत होते.

कानात एअरपॉड आणि तोंडातून सिगारेट लटकत त्याने कुराण वारंवार फाडले आणि नंतर पेटवले. मोमिका हा इराकी निर्वासित आहे आणि स्वीडनमध्ये कुराणवर बंदी घालण्याची त्याची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St. Xavier Exposition: शव प्रदर्शनाला 8 दशलक्ष लोकं हजेरी लावण्याची शक्यता; गोव्यात होणार 45 दिवसांचा भावदीव्य सोहळा

मंत्री गोविंद गावडेंच्या अडचणी वाढणार? Cash For job Scam प्रकरणात कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला अटक

Goa Politics: 'कळंगुट'सोडून मायकल मांद्रेतून लढणार? 2027 च्या निवडणुकीबाबत लोबोंचे मोठं भाष्य

Antony Thattil: 15 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अडकणार लग्नबंधनात; कोण आहे कीर्तीचा करोडपती नवरा?

IFFI 2024: मडगावात यंदा इफ्फीतील चित्रपट प्रदर्शन खुल्या जागेत होणार; रवींद्र भवनच्या अध्यक्षांची माहिती

SCROLL FOR NEXT