Sweden Quran Burns Dainik Gomantak
ग्लोबल

Sweden Quran Burns: बकरी ईदच्या मुहूर्तावर स्वीडनमध्ये जाळले कुराण, इस्लामिक देशांनी व्यक्त केला संताप; सौदी-तुर्कीने...!

Sweden Quran Burns: स्वीडनमध्ये बुधवारी बकरी ईदच्या मुहूर्तावर मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ कुराण जाळण्यात आला.

Manish Jadhav

Sweden Quran Burns: स्वीडनमध्ये बुधवारी बकरी ईदच्या मुहूर्तावर मुस्लिमांचा पवित्र धर्म ग्रंथ कुराण जाळण्यात आला. बुधवारी स्टॉकहोमच्या मध्यवर्ती मशिदीबाहेर एका व्यक्तीने कुराणची प्रत फाडून जाळली.

कुराण दहनाच्या घटनेनंतर इस्लामिक देशांमध्ये स्वीडनविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर नाटोमध्ये सहभागी होण्याच्या स्वीडनच्या प्रयत्नाला मोठा धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे. नाटोमध्ये सामील होण्याच्या स्वीडनच्या बोलीला तुर्की आता समर्थन देण्याची शक्यता नाही.

स्वीडनमध्ये कुराण जाळले

स्वीडन (Sweden) आणि नॉर्डिक देशांमध्ये मुस्लिम कट्टरपंथीयांचा उदय झाल्यापासून मुस्लिमांविरुद्धचा रोष वाढत आहे. स्वीडनमध्ये तसेच अनेक नॉर्डिक देशांमध्ये लोक आता उघडपणे इस्लामिक कट्टरतावाद्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरु लागले आहेत. लोकांचा आरोप आहे की, निर्वासित म्हणून आलेले मुस्लिम आता देशात धर्मांतर करत आहेत.

विशेष म्हणजे, शरियानुसार कायदे करण्याची मागणी करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून, स्वीडनमध्ये तसेच नॉर्डिक देशांमध्ये अनेक उजव्या विचारसरणीच्या नेत्यांचा उदय झाला आहे, ज्यांनी कट्टरपंथी मुस्लिमांच्या विरोधात आवाज उठवला आहे.

तसेच, स्वीडनमध्ये एक दिवस आधी कुराण जाळण्यावर बंदी घालणारी पोलिसांची बंदी न्यायालयाने फेटाळली होती. स्वीडिश न्यायालयाने (Court) आपल्या निर्णयात पोलिसांचे निर्बंध लोकांच्या भाषण स्वातंत्र्याविरुद्ध असल्याचे सांगितले होते.

न्यायालयाच्या आदेशानंतर स्वीडिश पोलिसांनी कुराण जाळण्याची परवानगी दिली. त्यानंतर स्टॉकहोमच्या मध्यवर्ती मशिदीबाहेर कुराण जाळण्यात आले.

कुराण जाळणारी व्यक्ती कोण होती?

रिपोर्टनुसार, कुराण जाळणाऱ्या व्यक्तीचे नाव सलवान मोमिका असून तो मूळचा इराकचा आहे. व्हायरल होत असलेल्या कुराण जाळण्याच्या व्हिडिओमध्ये सलवान मोमिका कुराणाची पाने फाडताना दिसत आहे.

त्याचवेळी ही घटना घडली त्यावेळी तिथे स्वीडनचे राष्ट्रगीत वाजवले जात होते. तर कुराणच्या प्रतिची अनेक पाने फाडून आरोपींनी ती पेटवून दिली. सलवान मोमिका ही इराकमधील विस्थापित व्यक्ती आहे, जी ISIS च्या दहशतवाद्यांनी त्याला आपले घर सोडण्यास भाग पाडल्यानंतर स्वीडनमध्ये आला.

इस्लामविरुद्ध द्वेष

त्याचवेळी, तुर्कस्तानने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली इस्लामविरुद्ध द्वेष पसरवत कुराण जाळण्याची परवानगी देणे आश्चर्यकारक असल्याचे म्हटले आहे.

त्याचबरोबर सौदी अरेबियासह अमेरिकेनेही कुराण जाळण्याच्या घटनेचा निषेध केला आहे. यूएस स्टेट डिपार्टमेंटचे उप प्रवक्ते वेदांत पटेल म्हणाले की, "अमेरिकेला ही घटना भयावह आणि दुःखद वाटत आहे".

दुसरीकडे, रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर स्वीडनने गेल्या वर्षी नाटोचे सदस्यत्व मागितले होते. परंतु नाटो सदस्य तुर्कीने ही प्रक्रिया अवरोधित केली आहे, स्वीडनने तुर्की लोकांना दहशतवादी मानल्याचा आणि त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करत असल्याचा आरोप केला आहे.

तसेच, तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हकान फिदान यांनी ट्विटमध्ये या कृत्याचा निषेध केला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली इस्लामविरोधी निदर्शनास परवानगी देणे अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT