Super El Nino Dainik Gomantak
ग्लोबल

Super El Nino: 450000 लोकांच्या जीवाला धोका! 'सुपर एल नीनो' ठरतोय खतरनाक, भारतसह 11 देशांमध्ये वाढला धोका; 2027 जगासाठी ठरणार विध्वंसक? VIDEO

Super El Nino Weather Pattern Pacific Ocean: प्रशांत महासागरात निर्माण झालेला ‘सुपर एल नीनो’ हा हवामानाचा पॅटर्न पुढील सहा महिन्यांत संपूर्ण जगासाठी अत्यंत धोकादायक ठरु शकतो.

Manish Jadhav

Super El Nino Weather Pattern Pacific Ocean: प्रशांत महासागरात निर्माण झालेला ‘सुपर एल नीनो’ हा हवामानाचा पॅटर्न पुढील सहा महिन्यांत संपूर्ण जगासाठी अत्यंत धोकादायक ठरु शकतो, असा गंभीर इशारा शिकागो विद्यापीठाच्या ‘क्लायमेट इम्पॅक्ट लॅब’ या जागतिक अनुसंधान संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात दिला. या हवामान बदलामुळे भारतसह जगभरातील 11 देशांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे सुमारे साडेचार लाख लोकांच्या मृत्यूची भीती व्यक्त करण्यात आली.

सप्टेंबर 2026 ते ऑगस्ट 2027 या कालावधीत वाढत्या तापमानामुळे (Temperature) हा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. अहवालानुसार, सुपर एल नीनोमुळे जगातील सरासरी तापमान सामान्य तापमानापेक्षा 1.2 अंश सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, पुढील सहा महिन्यांत सामान्य वर्षाच्या तुलनेत तब्बल 44 टक्के अधिक उष्ण दिवस अनुभवायला मिळू शकतात.

हवामान बदलामुळे पृथ्वीचा नैसर्गिक समतोल बिघडल्यामुळे एल नीनो अधिक शक्तिशाली आणि विनाशकारी ठरत आहे. पाऊस, तीव्र दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती आणि अन्नधान्याचे उत्पादन घटल्यामुळे निर्माण झालेल्या संकाटामुळे लोकांचे जीव धोक्यात आले आहेत. संयुक्त राष्ट्र आणि ब्रिटनच्या हवामान वैज्ञानिकांनी यापूर्वीच इशारा दिला की, हा एल नीनो गेल्या अनेक वर्षांतील सर्वात शक्तिशाली असेल, ज्यामुळे समुद्राचे तापमान विक्रमी पातळीवर पोहोचेल. तथापि, प्रभावित देश इशाऱ्यांना गांभीर्याने घेऊन योग्य खबरदारीचे उपाय आणि प्रतिबंधात्मक पावले उचलून लोकांचे जीव वाचवू शकतात.

या संशोधनानुसार, भारतात या भीषण उष्णतेमुळे सुमारे 16 हजार लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली, ज्यापैकी जवळपास 7,500 मृत्यू हे डिसेंबर 2026 ते फेब्रुवारी 2027 या काळातच होऊ शकतात. भारताशिवाय इतर 10 देशांवरही याचा मोठा प्रभाव पडणार असून, नायजेरियामध्ये 31,400, सुदानमध्ये 17,500, नायजरमध्ये 10,000, चाडमध्ये 8,000, फिलिपिन्स, व्हिएतनाम, थायलंड आणि कंबोडियामध्ये मिळून 19,400, इंडोनेशियामध्ये 19,300 तर ब्राझीलमध्ये 13,300 लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

जागतिक हवामान संघटना आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय महासागरीय व वायुमंडलीय प्रशासनाच्या मते, एल नीनोचा प्रभाव अजून पूर्णपणे शिगेला पोहोचलेला नाही. मात्र, डिसेंबरपर्यंत तो अधिक शक्तिशाली होऊन सुपर एल नीनोचे रुप धारण करेल आणि 2027 मध्येही त्याचे मोठे संकट कायम राहील. 3 सप्टेंबर रोजी हा वेदर पॅटर्न तयार झाला असून, फेब्रुवारी 2027 पर्यंत तो कायम राहण्याची 100 टक्के शक्यता वर्तवली जात आहे. प्रशांत महासागराच्या पूर्व भागातील तापमान सामान्यपेक्षा 3 अंश सेल्सिअसने जास्त आहे. त्यामुळे आगामी काळात भारत आणि पाकिस्तानसह आशियाई देशांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार असून नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT