Sudan Attack Dainik Gomantak
ग्लोबल

Sudan Attack: सुदान पुन्हा हादरलं! जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्यांवरच काळाचा घाला; गोळीबारात 8 मुलांसह 24 निष्पाप नागरिकांचा मृत्यू

Sudan RSF Attack: देशातील कुप्रसिद्ध निमलष्करी गट 'रॅपिड सपोर्ट फोर्स'ने (RSF) मध्य सुदानमध्ये एक अत्यंत भीषण हल्ला केला.

Manish Jadhav

Sudan RSF Attack: सुदानमधील रक्तरंजित संघर्षाने आता क्रूरतेची सीमा ओलांडली असून देशातील कुप्रसिद्ध निमलष्करी गट 'रॅपिड सपोर्ट फोर्स'ने (RSF) मध्य सुदानमध्ये एक अत्यंत भीषण हल्ला केला. शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी उत्तर कोर्डोफान प्रांतात झालेल्या या हल्ल्यात आपला जीव वाचवून सुरक्षित स्थळी पळणाऱ्या निष्पाप नागरिकांना लक्ष्य करण्यात आले. एका वाहनातून प्रवास करणाऱ्या लोकांवर झालेल्या या गोळीबारात 24 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये आठ लहान मुलांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे सुदानमधील मानवी हक्कांच्या पायमल्लीचा प्रश्न पुन्हा एकदा जागतिक स्तरावर ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही हृदयद्रावक घटना उत्तर कोर्डोफानमधील रहाद शहराच्या दक्षिणेकडील भागात घडली. हिंसाचाराने होरपळलेल्या दुबेइकर परिसरातून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काही कुटुंबे एका वाहनातून सुरक्षित ठिकाणाकडे निघाली होती. या वाहनात मोठ्या संख्येने महिला, वृद्ध आणि मुले स्वार होती. मात्र, वाटेतच या वाहनावर हल्ला करण्यात आला. 'सुदान डॉक्टर्स नेटवर्क'ने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये दोन लहान अर्भकांचाही समावेश आहे, जे अत्यंत धक्कादायक आहे. युद्धाच्या भीतीने पळणाऱ्या हतबल नागरिकांवर अशा प्रकारे झालेला हल्ला सुदानमधील बिघडलेल्या परिस्थितीचे भयावह वास्तव दर्शवतो.

या भीषण नरसंहारानंतर सुदानमधील डॉक्टर आणि सामाजिक संघटनांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदतीसाठी टाहो फोडला आहे. सुदान डॉक्टर्स नेटवर्कने संयुक्त राष्ट्र (UN) आणि मानवाधिकार संघटनांना या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. निष्पाप नागरिकांच्या सुरक्षेची हमी मिळावी आणि अशा क्रूर गुन्ह्यांसाठी जबाबदार असलेल्या RSF च्या नेतृत्वाला आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार शिक्षा व्हावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. मात्र, या गंभीर आरोपानंतरही आरएसएफकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा बाजू मांडण्यात आलेली नाही.

सुदानमधील हा सत्तासंघर्ष एप्रिल 2023 मध्ये सुरु झाला होता, जेव्हा सुदानी लष्कर आणि आरएसएफ यांच्यातील मतभेद उघड युद्धाच्या रुपात रस्त्यावर आले. राजधानी खार्तूमपासून सुरु झालेली ही लढाई आता संपूर्ण देशात पसरली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 40,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, परंतु जमिनीवरील परिस्थिती पाहता मृतांचा वास्तविक आकडा यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या युद्धामुळे सुदानमध्ये जगातील सर्वात मोठे मानवी संकट निर्माण झाले असून सुमारे 1.4 कोटी लोक निर्वासित झाले आहेत. संपूर्ण देशात उपासमार, महामारी आणि मृत्यूचे सावट पसरले असून, सामान्य नागरिक मात्र या सत्तेच्या दोन गटांच्या लढाईत भरडला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT