Sudan

 

Dainik Gomantak 

ग्लोबल

'या' देशातील 20 लाख लोकांवर आली अन्नाविना राहण्याची वेळ !

गोदामांवर झालेल्या हल्ल्यांनंतर सुदानच्या (Sudan) उत्तरेकडील डार्फर प्रांतामधील कामकाज तात्पुरते स्थगित करण्यात आले. त्यामुळे सुमारे 20 लाख लोकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

संपूर्ण जग कोरोनाच्या सावटाखाली जगत आहे. दुसरीकडे सुदानमध्ये कोरोनाचा हाहाकार असताना नागरिक भुखेने बेहाल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी 62 भारतीय सुदानमध्ये अडकले असल्याची बातमी आल्यानंतर सुदानमधील परिस्थिती नेमकी काय असू शकते याचा अंदाज लावलेलाच बरा. यातच आता जागतिक अन्न कार्यक्रम (WFP) ने अलीकडेचगोदामांवर झालेल्या हल्ल्यांनंतर सुदानच्या (Sudan) उत्तरेकडील डार्फर प्रांतामधील कामकाज तात्पुरते स्थगित करण्यात आले. त्यामुळे सुमारे 20 लाख लोकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. यूएन फूड एजन्सीच्या निवेदनात म्हटले आहे की, या भागातील तीन गोदामांतील 5,000 मेट्रिक टन धान्य चोरीला गेले. या घटनेनंतर कर्फ्यू (Curfew) लागू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या आठवड्याच्या सुरुवातीला डब्ल्यूएफपीने सांगितले होते की, एका सशस्त्र गटाने उत्तर दारफुर प्रांताची राजधानी असलेल्या अल फशरमधील एका गोदामावर हल्ला केला, ज्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांना संपूर्ण प्रांतात कर्फ्यू लागू करण्याची वेळ आली होती. त्यानंतरही, डब्ल्यूएफपीच्या म्हणण्यानुसार, शेकडो दरोडेखोरांनी गोदामांची तोडफोड करुनही गुरुवारी पहाटेपर्यंत हल्ले सुरुच ठेवले होते. यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस (António Guterres) यांनी सुदान सरकारला सुव्यवस्था पुनर्संचयित करण्याचे आवाहन केले आहे.

सामान्य वातावरण निर्माण करण्यास सुरुवात

दरम्यान, सुदानी अधिकाऱ्यांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की, पूर्वीच्या UNAMID मालमत्तेचा वापर नागरिकांसाठी काटेकोरपणे केला जाईल (United Nations Food Looted). यूएन प्रमुखांनी सुदानी अधिकाऱ्यांना देशात सामान्य वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले आहे. तसेच या प्रदेशातील उर्वरित यूएन ऑपरेशन्ससाठी रस्ता सुनिश्चित करण्यासाठी देखील आवाहन केले.

20 लाख लोकांवर उपाशी राहण्याची वेळ

कार्यक्रमाचे संचालक डेव्हिड बेझले यावेळी म्हणाले, ' या धान्य चोरीमुळे सुमारे 20 लाख लोकांवर अन्नाविना राहण्याची वेळ आली आहे. (Sudan Crisis) हा केवळ आम्ही या देशात राबवत असलेल्या ऑपरेशन्सला धक्काच नाही तर आमच्या कर्मचार्‍यांचे जीवन धोक्यात आले आहे. त्याचबरोबर गरीब सुदानी नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्याची आमची क्षमता देखील धोक्यात आली आहे.' सत्तापालटानंतर झालेल्या राजकीय गोंधळाच्या दरम्यान हे घडतं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT