Earthquake News Dainik Gomantak
ग्लोबल

Earthquake: भारताच्या शेजारील देशात भूकंपाचे जोरदार धक्के, लोकांमध्ये घबराटीचे वातावरण!

Earthquake In Sri Lanka: श्रीलंकेत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.2 इतकी मोजली गेली आहे.

Manish Jadhav

Earthquake In Sri Lanka: श्रीलंकेत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.2 इतकी मोजली गेली आहे. दुपारी 12.31 वाजता भूकंप झाला. त्याचे केंद्र कोलंबोच्या दक्षिण-पूर्वेस 10 किलोमीटर अंतरावर होते.

मात्र, सध्या कोणतीही जीवितहानी किंवा मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. तरीही भूकंपामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. लोक घाबरुन घरातून आणि कार्यालयातून बाहेर पडले.

श्रीलंकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण आणि माइन्स ब्युरोने सांगितले की, भूकंपाचा कोणताही धोका नाही. तथापि, श्रीलंकेचे (Sri Lanka) अधिकारी सध्या भूकंपाच्या प्रभावाचे मूल्यांकन करत आहेत.

ताजिकिस्तान आणि पाकिस्तानमध्येही भूकंप झाला

याआधी ताजिकिस्तानमध्ये सोमवारी संध्याकाळी 4.9 रिश्टर स्केलचा भूकंप (Earthquake) झाला होता. सिस्मॉलॉजिकल सेंटरच्या म्हणण्यानुसार, सोमवारी संध्याकाळी 5:46 च्या सुमारास भूकंपाचे हे धक्के जाणवले.

11 नोव्हेंबर रोजी भारताचा आणखी एक शेजारी देश पाकिस्तानमध्ये भूकंप झाला. 11 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:06 वाजता पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.1 इतकी होती. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.

घरांमध्ये असलेले लोक बाहेर आले होते. या वर्षाच्या सुरुवातीला मे, जून आणि जुलैमध्ये पाकिस्तानमध्ये भूकंपाचे मोठे धक्के जाणवले होते.

संरक्षण कसे करावे?

अचानक भूकंप झाला तर ताबडतोब घराबाहेर किंवा कार्यालयाबाहेर पडा. जर तुम्ही घरात अडकले असाल तर पलंगाखाली किंवा मजबूत टेबलाखाली लपून राहा. घराच्या कानाकोपऱ्यात उभे राहूनही तुम्ही स्वतःला वाचवू शकता.

भूकंपाच्या वेळी लिफ्टचा अजिबात वापर करु नका. मोकळ्या जागेवर जा, झाडे आणि वीज तारांपासून दूर राहा. याशिवाय, भूकंपरोधक घरेही तितकीच महत्त्वाची आहेत. हे फार महाग नसले तरी लोकांमध्ये याबाबत जागरुकता नसल्यामुळे अनेकदा लोक त्याकडे दुर्लक्ष करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT