Shehbaz Sharif & Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

गृहयुद्ध भडकावणे थांबवा, अन्यथा...: पंतप्रधान शाहबाज यांचा इम्रान खान इशारा

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान (Imran Khan) यांना देशात गृहयुद्ध भडकवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांना देशात गृहयुद्ध भडकवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. शाहबाज यांनी रविवारी इम्रान खान यांचे अबोटाबादमधील भाषण हे पाकिस्तानविरुद्धचे (Pakistan) षड्यंत्र असल्याचे म्हटले होते. (Stop provoking civil war otherwise legal action will be taken PM Shehbaz Sharif warns Imran Khan)

पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले, "पाकिस्तानची 22 कोटी जनता एका व्यक्तीची राज्यघटना आणि राष्ट्रीय संस्थांची गुलाम नाही. इम्रान खान यांना लोकांना गुलाम बनवायचे आहे, पण आम्ही त्यांना पाकिस्तानचा हिटलर बनू देणार नाही. इम्रान नियाझी खूप खोटे बोलले, पण आता त्यांना सत्याला सामोरं जावं लागेल."

शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) पुढे म्हणाले की, 'मीर जाफर आणि मीर सादिक यांनीच राष्ट्रीय संस्थांविरोधात कट रचला होता.' त्यांनी खान यांची तुलना मीर जाफर आणि मीर सादिक यांच्याशी केली, ज्यांना पाकिस्तानला लिबिया आणि इराकसारखे (Iraq) बनवायचे होते. मीर सादिक हा म्हैसूरच्या टिपू सुलतानचा मंत्री होता, अशी माहिती आहे. 1798-99 मधील चौथ्या अँग्लो-म्हैसूर युद्धात श्रीरंगपट्टणाच्या वेढादरम्यान त्याने टिपू सुलतानचा विश्वासघात केला आणि ब्रिटिशांच्या विजयाचा मार्ग मोकळा केला होता.

'पाकिस्तानची राज्यघटना आणि राष्ट्रीय संस्थांना आव्हान'

अबोटाबादमधील रॅलीदरम्यान इम्रान खान यांच्या भाषणाचा संदर्भ देत शाहबाज शरीफ म्हणाले की, 'आज पाकिस्तानची स्थिती, संविधान आणि राष्ट्रीय संस्थांना आव्हान देण्यात आले आहे, ज्यामुळे पीटीआय अध्यक्षांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.'

'हे राजकारण नाही, पाकिस्तानविरुद्धचे षड्यंत्र आहे'

शाहबाज पुढे म्हणाले की, ''इम्रान खान राजकारणात षडयंत्र रचत नाहीत, तर ते पाकिस्तानविरोधात कट रचत आहेत. "एका व्यक्तीच्या अहंकाराच्या आणि खोट्याच्या आधारावर पाकिस्तानचा बळी दिला जाऊ शकत नाही. आधी इम्रान नियाझीने पाकिस्तानची अर्थव्यवस्था बुडवण्याचा कट रचला आणि आता तो गृहयुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत आहे."

काय म्हणाले इम्रान खान?

तत्पूर्वी, अबोटाबादमधील सभेत इम्रान खान यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तो भिकारी, नोकर आणि चोर असल्याचा दावा त्यांनी यावेळी बोलताना केला. तर दुसरीकडे, इम्रान खान यांनी दावा केला की, "शरीफ कुटुंबाने पाकिस्तानशी गद्दारी केली आहे. आयात केलेले सरकार सत्तेवर आल्यावर सर्व वस्तूंच्या किमती वाढल्या. चोरीचा पैसा परदेशात पाठवा. पाकिस्तानी रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची किंमत वाढली आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT