Gotabaya Rajapaksa Dainik Gomantak
ग्लोबल

Sri Lanka Political Crisis: राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी सोडला देश

श्रीलंकेचे राष्ट्रपती महिंदा गोटाबाया राजपक्षे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने होत असताना त्यांनी देश सोडला आहे.

दैनिक गोमन्तक

Sri Lanka Political Crisis: श्रीलंकेचे राष्ट्रपती महिंदा गोटाबाया राजपक्षे यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने होत असताना त्यांनी देश सोडला आहे. श्रीलंका सरकारच्या (Government) विश्वसनीय सूत्रांनी हिरु न्यूज या स्थानिक वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. त्यांनी पुढे सांगितले की, गोटाबाया राजपक्षे शेजारील देशात आहेत. बुधवारी ते श्रीलंकेला परत येतील.

दरम्यान, गोटाबाया राजपक्षे यांनी 13 जुलै रोजी अधिकृतपणे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (Prime Minister Ranil Wickremesinghe) यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे. बुधवारी राजीनामा दिल्यानंतरच ते मायदेशी परततील, असा अंदाज आहे. देशाच्या गंभीर आर्थिक संकटाचा (Financial Crisis) सामना करण्यात अपयशी ठरल्याबद्दल आंदोलकांनी त्यांना पायउतार होण्यास सांगितले असताना त्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली.

तसेच, पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, आंदोलकांनी त्यांच्या खाजगी निवासस्थानात घुसून आग लावली होती. पंतप्रधान कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी अधिकृतपणे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना सांगितले की, ते त्यांच्या आधीच्या घोषणेनुसार 13 जुलै रोजी राजीनामा देतील.

शिवाय, राष्ट्रपती राजपक्षे बुधवारी राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर, श्रीलंकेतील (Sri Lanka) मुख्य विरोधी पक्षांची रविवारी बैठक झाली आणि सर्वपक्षीय अंतरिम सरकार स्थापन करण्यावर सहमती झाली. वृत्तानुसार, राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर सोमवारी नव्या राष्ट्राध्यक्षाची नियुक्ती आणि नवीन सरकार स्थापनेवर चर्चा होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT