Sri Lanka Crisis: पूलमध्ये मजा, जिममध्ये जॉगिंग, आंदोलकांची सेल्फी आणि बरच काही...

श्रीलंकेतील लोकशाहीचा एक महत्त्वाचा भाग असलेले राष्ट्रपती भवन बनले पिकनिक स्पॉट
Sri Lanka Political Crisis
Sri Lanka Political CrisisTwitter
Published on
Updated on
Sri Lanka Political Crisis
Sri Lanka Political CrisisTwitter

श्रीलंकेत सुरू असलेल्या गदारोळात आंदोलक राष्ट्रपती भवनात मस्ती करत आहेत. असे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत, ज्यांना पाहून लोक याला पिकनिक स्पॉट म्हणत आहेत. यावेळी कोणी राष्ट्रपती भवनात जिमिंग करत आहे तर कोणी स्विमिंग पूलचा आनंद घेत आहे. (Sri Lanka Political Crisis)

राष्ट्रपती भवनासमोर आंदोलकांची गर्दी मोठी आहे. हे लोक सेल्फी क्लिक करत आहेत, कोणत्या ना कोणत्या प्रकारे आत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रपती भवन हा श्रीलंकेतील लोकशाहीचा एक महत्त्वाचा भाग आहे, पण या फोटोंमध्ये ते केवळ पिकनिक स्पॉट बनले आहे.

Sri Lanka Political Crisis
Sri Lanka Political CrisisTwitter

आता हे आंदोलक बाहेर उभे राहून सेल्फी घेत आहेत तर अनेक जण आतल्या आलिशान स्विमिंग पूलचा आनंद लुटत आहेत. या फोटोंमध्ये एक माणूस अगदी आरामात पोहताना दिसत आहे. लोक स्विमिंग पूलच्या आसपास मजा करताना दिसतात.

Sri Lanka Political Crisis
Sri Lanka Political CrisisTwitter

सोशल मीडियावर हे फोटो ट्रेंड होत आहेत. ज्यामध्ये काही व्यक्ती राष्ट्रपती भवनातील आरामदायी फर्निचरवर बसून सेल्फी काढत आहे. तिथले स्वयंपाकघर वापरत आहेत, तिथले पदार्थ बनवत आहेत.

Sri Lanka Political Crisis
Sri Lanka Political CrisisTwitter

आता राष्ट्रपती भवनावर आंदोलक बसले असतील तर बाहेर उभे असलेले पोलिस त्यांच्याकडे केवळ लाचार होऊन पाहत आहेत. सध्या राष्ट्रपती भवनाच्या आत आंदोलकांची संख्या एवढी आहे की, पोलिसांना हवे असले तरी काहीही करता येत नाही. यावेळी काही पोलीस रस्त्यावर उभे असलेले दिसत आहेत.

Sri Lanka Political Crisis
Sri Lanka Political CrisisTwitter

राष्ट्रपती भवनात बसलेले हे आंदोलक स्पष्टपणे सांगत आहेत की जोपर्यंत गोटाबाया राजपक्षे आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत कोणीही हे भवन सोडणार नाही. त्यांच्या बाजूने पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा ताबाही घेतला जात असल्याचे बोलले जात आहे. याच कारणामुळे श्रीलंकेतील परिस्थिती सध्या अधिकच आक्रमक बनली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com