Prime Minister Mahinda Rajapaksa dainik gomantak
ग्लोबल

Sri Lanka Economic Crisis: PM Mahinda Rajapaksa यांच्या मंत्रिमंडळातील सार्‍यांचा राजीनामा

श्रीलंकेतील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट मंत्र्यांनी दिले सामूहिक राजीनामे

दैनिक गोमन्तक

Sri Lanka Economic downturn : श्रीलंकेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत देशाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्याशिवाय श्रीलंकेच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी तत्काळ आपले राजीनामे दिले आहेत. संपूर्ण देश आर्थिक संकटाचा सामना करत असताना देशाची राजकीय स्थिती हादरली आहे. देशातील आर्थिक मंदीविरोधात लोकांचा रोष शिगेला पोहोचला असून देशाचे राजकारण विखुरले जात आहे. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा मुलगा नमल राजपक्षे यांनी आपल्या सर्व खात्यांचा राजीनामा असून पंतप्रधान महिंदा मात्र त्यांच्या पदावर राहतील. (Sri Lankan Cabinet resigns amid economic crisis)

सध्या श्रीलंका (Sri Lanka) सर्वात वाईट आर्थिक मंदी अनुभवत असतानाच 3 एप्रिलच्या रात्री श्रीलंकेच्या कॅबिनेट मंत्रीमंडळाने आपला राजीनामा दिला. यावेळी सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी (Cabinet Ministers) एका कागदावर आपल्या स्वाक्षरी केल्या. हे श्रीलंकेच्या पंतप्रधानांसह, राष्ट्रपतीं पाठविण्यात आले आहेत. हा सामूहिक राजीनामा श्रीलंकेच्या पंतप्रधानांसह, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना सुपूर्द करण्यात येणार आहे.

येत्या काही दिवसांत नवीन मंत्रिमंडळ स्थापन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी, देशाचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे पुत्र नमल राजपक्षे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आणि म्हटले की, 'मी सचिवांना माहिती दिली आहे. राष्ट्रपतींना (President) माझ्या सर्व विभागांमधून तात्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. आशा आहे की यामुळे श्रीलंकेच्या लोकांसाठी आणि सरकारसाठी स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी महामहिम आणि पंतप्रधानांच्या निर्णयात मदत होईल. मी माझा मतदार, माझा पक्ष आणि हंबनथोटा येथील जनतेशी बांधील आहे. तर मतदारांसाठी काम करत राहीन असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान वाढत्या सार्वजनिक अशांततेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान राजपक्षे (Prime Minister Mahinda Rajapaksa) यांनी शुक्रवारी (1 एप्रिल) उशिरा देशव्यापी आणीबाणीची घोषणा केली होती. सार्वजनिक सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्थेचे संरक्षण आणि पुरवठा आणि अत्यावश्यक सेवांची देखभाल सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात विरोध सुरू करण्यात आला होता. त्याला सरकारने 36 तासांचा कर्फ्यू (Curfew) लागू करून प्रत्युत्तर दिले. संध्याकाळपासून, अफवा पसरत आहेत की राजपक्षे हे आर्थिक संकट हाताळण्यासाठी अंतरिम सरकार निवडू शकतात. आज सकाळी श्रीलंकेमधील कर्फ्यू उठवण्यात आला आहे.

श्रीलंकेतील राजकीय तज्ज्ञांच्या मते, कोरोना काळात पर्यटनावरील (tourism) बंदीमुळे परकीय चलनात मोठी घसरण झाली. त्याचा फटका आता श्रीलंकेला बसला असून त्यामुळेच श्रीलंकेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT