World Bank  Dainik Gomantak
ग्लोबल

जागतिक बँकेकडून श्रीलंकेला 16 कोटी डॉलरची मदत

एशियन डेवलपमेंट बँकेकडूनही मदतीची अपेक्षा आहे : पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे

दैनिक गोमन्तक

स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेला जागतिक बँकेकडून 16 कोटी डॉलरची मदत मिळाली आहे. संसदेत पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे म्हणाले, हे पैसे इंधनच्या खरेदीसाठी वापरले जाऊ शकतात. आम्हाला एशियन डेवलपमेंट बँकेकडूनही मदतीची अपेक्षा आहे. देशातील उग्र निदर्शनांदरम्यान, ही रक्कम आर्थिक संकटावर मात करण्यासाठी उपयोगी ठरेल. (Sri Lanka gets 16 crore dollar aid from World bank)

सोमवारी रात्री देशाला संबोधित करताना विक्रमसिंघे यांनी सांगितले होते की, भारताने पाठवलेले इंधन या आठवड्यात देशात पोहचेल.

सरकार म्हणाले- पेट्रोल नाही, पंपावर लाईन लावू नका
श्रीलंका सरकारने बुधवारी जनतेला स्पष्टपणे सांगितले की, देशाकडे पेट्रोल घेण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे पेट्रोल पंपावर रांगा लावू नका. मात्र, देशात डिझेल उपलब्ध आहे. पेट्रोल वाहून नेणारे जहाज 28 मार्चपासून श्रीलंकेत किनाऱ्यावर उभे आहे, मात्र सरकारकडे त्याचे पैसे देण्यासाठी अमेरिकन डॉलर नाहीत.

पंपांवर पेट्रोल नसल्याने तेथे गर्दी करू नये. आम्ही पेट्रोलचा पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत. जनतेने आम्हाला सहकार्य करावे.

- कांचन विजेशेखर, ऊर्जामंत्री, श्रीलंका

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT