Gotabaya Rajapaksa Dainik Gomantak
ग्लोबल

राजीनामा देऊनही लंकेची सेवा करणार... गोटाबाया राजपक्षे

श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी राजीनामा दिला असून आज संसदेचे सचिव धम्मिका दासनायके यांनी त्यांचा राजीनामा औपचारिकपणे संसदेत सादर केला होता.

दैनिक गोमन्तक

श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa Resignation) यांनी राजीनामा दिला असून आज संसदेचे सचिव धम्मिका दासनायके यांनी त्यांचा राजीनामा औपचारिकपणे संसदेत सादर केला होता. माजी राष्ट्रपती राजपक्षे यांनी संसदेच्या अध्यक्षांना संबोधित करताना म्हटले की, कोविड-19 महामारीमुळे देशात आर्थिक संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. (Sri lanka Former President Gotabaya Rajapaksa said I will continue to serve country even after resigning)

आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यासाठी पाऊले उचलल्याचे राजपक्षे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. राजपक्षे यांनी राजीनामा पत्रात लिहिले की, "मी माझ्या सर्व शक्तीनिशी मातृभूमीचे रक्षण केले आणि भविष्यातही करत राहीन."

लॉकडाऊनमुळे फॉरेक्सची स्थिती बिघडली

राजपक्षे म्हणाले की, "त्या वेळी आधीच खराब आर्थिक वातावरणामुळे मी लोकांना साथीच्या आजारापासून वाचवण्यासाठी कारवाई केली होती." ते म्हणाले की, "मला 2020 आणि 2021 दरम्यान लॉकडाऊनचे आदेश देणे भाग पडले आणि परकीय चलनाची स्थिती बिघडण्यास सुरुवात झाली. माझ्या मते, मी सर्वपक्षीय किंवा राष्ट्रीय सरकार स्थापन करण्याचा सल्ला देऊन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वोत्तम पाऊले उचलले आहेत.'

राजपक्षे सिंगापूरला पोहोचले

राजपक्षे यांनी पत्रात म्हटले की, '9 जुलै रोजी पक्षाच्या नेत्यांची इच्छा समजल्यानंतर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता.' बुधवारी ते मालदीवला पळून गेले आणि त्यानंतर गुरुवारी सिंगापूरला पोहोचले. सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की राजपक्षे यांनी आश्रय मागितला नाही किंवा त्यांना आश्रय दिला गेला नाही आणि त्यांना "खाजगी भेटी" वर देशात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT