Sri Lanka Womens Shift to Prostitution for Food and Medicines  Dainik Gomantak
ग्लोबल

Sri Lanka त वेश्यालयांचा पूर, जिवनावश्यक वस्तूंसाठी महिलांना विकावं लागतयं शरीर

श्रीलंकेतील लोकांची स्थिती बिकट, अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात, व्यवसाय ठप्प, घर चालवण्यासाठी महिलांना करावी लागतेय कसरत

दैनिक गोमन्तक

Sri Lanka Crisis: ऐतिहासिक आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेतील लोकांची स्थिती बिकट आहे. अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. व्यवसाय ठप्प होत आहेत. घर चालवण्यासाठी लोकांना कसरत करावी लागत आहे. अशा स्थितीत गेल्या काही वर्षांत देशातील वेश्याव्यवसायात (Prostitution) झपाट्याने वाढ झाली आहे. नोकरीचे संकट, प्रचंड खर्च आणि कुटुंबाचे पोट भरण्यासाठी अनेक महिलांना सेक्स वर्कर बनावे लागले आहे, अशी माहिती स्थानिक NGOने दिली आहे.

जानेवारीपासून देशात आयुर्वेदिक स्पा केंद्रांची संख्या वाढल्याचे अहवालात म्हटले आहे. यापैकी अनेक केंद्रे केवळ पडदे टाकून आणि पलंग टाकून तात्पुरत्या वेश्यालयात रूपांतरित झाली आहेत. येथे महिलांना आपले शरीर विकावे लागते. वेश्या व्यवसाय करणाऱ्या अनेक महिला या कापड उद्योगातील आहेत. आर्थिक संकटात श्रीलंकेच्या वस्त्रोद्योगाला मोठा फटका बसला आहे. नोकरीवरून काढल्या जाण्याच्या भीतीने येथे काम करणाऱ्या अनेक महिला या क्षेत्रात पर्यायी रोजगाराच्या संधी शोधत आहेत.

अशाच एका सेक्स वर्कमध्ये गुंतलेल्या महिलेने श्रीलंकन ​​दैनिक द मॉर्निंग या वृत्तपत्राला सांगितले की, "आर्थिक संकटामुळे नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत, त्यामुळे वेश्याव्यवसाय हाच सर्वोत्तम उपाय आहे. पूर्वी आम्हाला सुमारे 28,000 रुपये मासिक पगार मिळायचा. ओव्हरटाईम करून 35,000 पर्यंत कमावायचे. मात्र या व्यवसायातून दररोज 15,000 पर्यंत कमाई होते. हे सगळेच मान्य करतील असे नाही, पण हे खरे आहे, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कापड कारखान्यातील माझी नोकरी गेली. संकटादरम्यान दुसर्‍या नोकरीतील उत्पन्न अपुरे होते. मग, एका स्पा मालकाने माझ्याकडे संपर्क साधला आणि मी सेक्स वर्कर म्हणून काम करायला सुरुवात केली कारण मला माझ्या कुटुंबासाठी पैशांची नितांत गरज होती."

यूके वृत्तपत्र टेलिग्राफने दावा केला आहे की या वर्षी जानेवारीपासून राजधानी कोलंबोमध्ये लैंगिक उद्योगात प्रवेश करणाऱ्या महिलांच्या संख्येत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यातील बहुतांश महिला वस्त्रोद्योगाशी संबंधित आहेत. सेक्स वर्कर्ससाठी काम करणाऱ्या श्रीलंकेतील सुप्रसिद्ध स्टँड अप मूव्हमेंट लंका (SUML) या संघटनेचा हवाला देत वृत्तपत्राने हा दावा केला आहे. एसयूएमएलचे कार्यकारी संचालक आशिला दांडेनिया सांगतात की, श्रीलंकेतील सद्यस्थितीत असे काही व्यवसाय आहेत की जिथे पैसे त्वरित मिळतात. त्यापैकी एक म्हणजे वेश्याव्यवसाय. या व्यवसायात उतरणाऱ्या अनेक महिला हे सर्व मजबुरीने करत असल्याचे अबवालात म्हटले आहे.

अहवालानुसार, कोलंबोच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील औद्योगिक परिसरात पोलिसांच्या कथित संरक्षणाखाली वेश्या व्यवसाय फोफावत आहे. या ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांना खूश करण्यासाठी महिलांना त्यांच्यासोबत लैंगिक संबध ठेवण्यास भाग पाडतात. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांनाही आपले शरीर विकावे लागत आहे. अन्न, औषध यांसारख्या गोष्टींसाठी पैसे नसल्याने त्यांना दुकानदारांसोबत संबध ठेवावे लागत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

"या आधी या महिला छोट्या नोकऱ्या करायच्या पण त्याही कमी झाल्या आहेत. त्या गावी परत जाऊ शकत नाहीत. खर्च गगनाला भिडल्याने अधिक कमाईसाठी सेक्सवर्कचा अवलंब करत आहेत. काही वेळा, त्यांच्यामध्ये अनपेक्षित गर्भधारणा होते. वाढत्या आर्थिक संकटात, गरिबी आणि आर्थिक संकटाची भीती वस्त्रोद्योगातून महिलांना देहव्यापाराकडे ढकलत आहे. त्यांना पर्याय नाही. एकतर त्यांच्या कुटुंबांकडे उत्पन्नाचा स्रोत नाही किंवा त्यांना त्यांच्या भागीदारांनी सोडून दिले आहे," असे स्टँड-अप मूव्हमेंट लंका या NGO साठी काम करणाऱ्या आशिला दांडेनिया यांनी ANI ला सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून मुलाने संपवले जीवन; उसगावात खळबळ

Rashi Bhavishya 14 November 2024: व्यवसायातून खास फायदा होईल, आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकं प्रसन्न राहतील; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Cash For Job Scam: 'मुख्यमंत्र्यांनी नोकरीत घोटाळा करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी', नरेश सावळ यांचे आवाहन

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत होणार दुर्गंधीमुक्त! पोलाद कारखाना, वृक्ष लागवडीसाठी होणार सांडपाण्‍याचा पुनर्वापर

'Cash For Job' ची दिल्लीत चर्चा! नोकर भरतीसंदर्भात श्‍वेतपत्रिका काढा; काँग्रेस सचिव शर्मा कडाडले

SCROLL FOR NEXT