Gotabaya Rajapaksa Dainik Gomantak
ग्लोबल

श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती Gotabaya Rajapaksa परतणार मायदेशी

Gotabaya Rajapaksa Latest News: श्रीलंकेचे उच्च लष्करी अधिकाऱ्यांनी अधिकृत माहिती दिली आहे.

दैनिक गोमन्तक

श्रीलंकेचे पदच्युत माझी राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे लवकरच मायदेशी परत येऊ शकतात. माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे देशात परतणार असल्याचे श्रीलंकेच्या सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्याने सांगितले आहे. राजपक्षे शनिवारी श्रीलंकेला परत येऊ शकतात, असे इतर मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. राजपक्षे सध्या वनवास भोगत आहेत. श्रीलंकेत पूर्वी इंधन आणि खाद्यपदार्थांच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे व्यापक जनआंदोलने झाली होती. लोकांनी राष्ट्रपती भवनावरही ताबा मिळवला, त्यामुळे गोटाबाया राजपक्षे यांना देशाचा राजीनामा द्यावा लागला.

9 जुलै रोजी श्रीलंकेच्या लोकांनी कोलंबोमधील राष्ट्रपतींचे निवासस्थान, कार्यालये आणि इतर सरकारी इमारतींवर हल्ला केला. प्रचंड जनआंदोलनामुळे राजपक्षे यांनी देश सोडला. देशातील अशांतता असताना 73 वर्षीय गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) प्रथम श्रीलंकेच्या लढाऊ विमानातून मालदीवला पळून गेले होते. त्यानंतर ते सिंगापूरला गेले होते.

त्यांनी 13 जुलै रोजी सिंगापूरमधून (Singapore) राजीनामा पाठवला. सिंगापूरमध्ये व्हिसाची मुदत संपल्यानंतर त्यांनी थायलंडमध्ये आश्रय घेतला. राजपक्षे यांच्याकडे राजनयिक स्तरावरील पासपोर्ट असल्याने त्यांना थायलंडमध्ये राहण्यासाठी एकूण 90 दिवसांचा कालावधी आहे. सध्या तो बँकॉकमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे.

रानिल विक्रमसिंघे यांची भूमिका काय आहे?

राजपक्षे यांनी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर श्रीलंकेच्या संसदेने रानिल विक्रमसिंघे यांना नवे अध्यक्ष बनवले. अलीकडेच रानिल विक्रमसिंघे म्हणाले की, राजपक्षे यांच्या देशात परतण्याची वेळ योग्य नाही. राजपक्षे आता देशात परतले तर पुन्हा एकदा निदर्शनं भडकू शकतात, असं ते म्हणाले होते.

श्रीलंकेतील एका वृत्तपत्राने लिहिले की, राष्ट्रपती विक्रमसिंघे यांना राजपक्षे यांनी आत्ताच देशात परतावे असे वाटत नाही. कारण लष्कर आणि पोलिसांनी मोठ्या परिश्रमानंतर शांतता प्रस्थापित केली आहे. वृत्तपत्राने लिहिले की, विक्रमसिंघे यांनी म्हटले आहे की, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नाही, त्यामुळे गोटाबाया यांनी देशात परत येऊ नये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून मुलाने संपवले जीवन; उसगावात खळबळ

Rashi Bhavishya 14 November 2024: व्यवसायातून खास फायदा होईल, आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकं प्रसन्न राहतील; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Cash For Job Scam: 'मुख्यमंत्र्यांनी नोकरीत घोटाळा करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी', नरेश सावळ यांचे आवाहन

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत होणार दुर्गंधीमुक्त! पोलाद कारखाना, वृक्ष लागवडीसाठी होणार सांडपाण्‍याचा पुनर्वापर

'Cash For Job' ची दिल्लीत चर्चा! नोकर भरतीसंदर्भात श्‍वेतपत्रिका काढा; काँग्रेस सचिव शर्मा कडाडले

SCROLL FOR NEXT