Sri Lanka Crisis News|  Dainik Gomantak
ग्लोबल

Sri Lanka Crisis: श्रीलंकेत आणीबाणी जाहीर, विक्रमसिंघे बनले काळजीवाहू राष्ट्रपती

श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देशातून पलायन केल्याने देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Sri Lanka Economic Crisis: श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी पलायन केल्याने देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी काही दिवसांपूर्वी 13 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, ते देशातून पळून गेल्यानंतर आता त्यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातच आता पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे देशाचे काळजीवाहू राष्ट्रपती बनले.

दुसरीकडे, राष्ट्रपती पळून गेल्यापासून कोलंबोतील (Colombo) पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर सार्वजनिक निदर्शने सुरु झाली आहेत. संतप्त आंदोलक सरकारविरोधात (Government) घोषणाबाजी करताना दिसत आहेत. जमावाने रस्त्यावर गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात लष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या.

पत्नीसह मालदीवमध्ये पोहोचल्याची चर्चा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) पत्नी, बॉडिगार्ड आणि पायलटसह मालदीवमध्ये पोहोचले आहेत. श्रीलंकेतून पळून जाण्यासाठी त्यांनी हवाई दलाच्या विमान AN-32 चा वापर केल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी ते श्रीलंकेत (Sri Lanka) लपून राहत होते. गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राष्ट्रपतींची कमान आता संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अभयवर्धन यांच्या हाती येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT