Sri Lanka Crisis Dainik Gomantak
ग्लोबल

श्रीलंकेत हिंसाचाराची शक्यता; विक्रमसिंघेंकडून लष्कर-पोलिसांना खुली सूट

श्रीलंकेतील कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी देशातील सुरक्षा यंत्रणांनी जे शक्य आहे ते करावे

दैनिक गोमन्तक

Sri Lanka Crisis: श्रीलंकेतील राजकीय परिस्थिती खूप बिकट झाली आहे. संपूर्ण देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडून पळ काढल्यानंतर श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांची हंगामी राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हीच फॅसिस्ट शक्ती आहेत जी आता विरोध करत आहेत. या शक्ती सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत, असे विक्रमसिंघे म्हणाले.

आंदोलकांनी पंतप्रधान कार्यालयावर कब्जा केला आहे. यावेळी सुरक्षा दलांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आले. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे 30 आंदोलक जखमी झाले आहेत. आंदोलकांना सामोरे जाण्यासाठी लष्कर आणि पोलिसांना सुट देण्यात आली आहे. देशातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी देशातील सुरक्षा यंत्रणांनी जे काही शक्य आहे ते करावे, असे विक्रमसिंघे यांनी आदेशात म्हटले आहे.

राष्ट्रपती राजपक्षे आणि पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्याची मागणी करत शनिवारी राजधानीतील राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती सचिवालय आणि पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान, टेम्पल ट्रीज या राजधानीतील तीन मुख्य इमारतींवर हल्ला करणाऱ्या आंदोलकांनी अजूनही तेथे कब्जा केला आहे. श्रीलंका, 22 दशलक्ष लोकसंख्येचा देश, अभूतपूर्व आर्थिक संकटात सापडला आहे, लाखो लोक अन्न, औषध, इंधन आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी संघर्ष करत आहेत.

टीव्ही प्रसारण निलंबित

निदर्शकांनी इमारतीवर हल्ला केल्याने बुधवारी देशाच्या सरकारी दूरदर्शन वाहिनी रुपविहिनीचे प्रक्षेपण निलंबित करण्यात आले. श्रीलंका रुपवाहिनी कॉर्पोरेशन (SLRC) ने सांगितले की, त्यांच्या अभियंत्यांनी चॅनेलचे थेट आणि रेकॉर्ड केलेले प्रसारण निलंबित केले कारण महामंडळाच्या परिसराला निदर्शकांनी वेढले होते. नंतर या वाहिनीने पुन्हा प्रसारण सुरू केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

X Post Scheduling Feature: WhatsApp नंतर आता X वरही भन्नाट फीचर! युजर्संना 18 महिने आधी पोस्ट शेड्यूल करता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग 2028 पर्यंत टळल्यास मोठा फटका? थकबाकीमुळे बिघडू शकतो हिशोब; अहवालात समोर आली महत्त्वाची माहिती

Goa Shipyard Dredger Launch: आंतरराष्ट्रीय जहाजबांधणीत गोवा शिपयार्डची झेप; अत्याधुनिक हायब्रीड ड्रेजरचे यशस्वी लॉन्चिंग

High Tide Waterlogging: खाडीच्या पाण्याचा नेवगीनगरला वेढा; महानगरपालिका कायमस्वरूपी उपाय कधी करणार?

Viral Video: होकार मिळताच झाला गेम! समुद्रकिनारी गर्लफ्रेंडला प्रपोज करणं पडलं महागात, महागडी हिऱ्याची अंगठी थेट समुद्रात पडली अन्... पाहा व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT