UK PM Race: भारतीय वंशाचे ऋषी सुनक मतदानाच्या पहिल्या फेरीत अव्वल

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक 88 मतांसह आघाडीवर आहेत.
Indian origin Rishi Sunak Wins First Round | UK PM News
Indian origin Rishi Sunak Wins First Round | UK PM NewsDainik Gomantak
Published on
Updated on

UK PM Race: ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक (Rishi Sunak) 88 मतांसह आघाडीवर आहेत. सध्या सुनक यांच्याशिवाय आणखी पाच दावेदार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. ब्रिटनचे नवे पंतप्रधान सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची जागा घेतील. (Indian origin Rishi Sunak Wins First Round)

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, सुनक व्यतिरिक्त, या यादीत परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस, वाणिज्य मंत्री पेनी मॉर्डेंट, माजी कॅबिनेट मंत्री केमी बॅडेनॉक, खासदार टॉम तुगेंधात आणि ब्रिटिश कॅबिनेट अॅटर्नी जनरल सुएला ब्रेव्हरमन यांचा समावेश आहे.

Indian origin Rishi Sunak Wins First Round | UK PM News
बोरिस जॉन्सननंतर यूकेचे पंतप्रधान कोण? भारतीय वंशाचे ऋषी सुनक शर्यतीत

ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी पहिल्या फेरीत बोरिस जॉन्सन यांना कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि यूकेचे पंतप्रधान म्हणून निवडून येण्यासाठी मतदानाच्या पहिल्या फेरीत सर्वाधिक मते मिळविली. कारण दोन उमेदवार पहिल्या फेरीत बाद झाले आहे. (UK PM News Updates)

भारतीय वंशाचे ब्रिटिश नेते ऋषी सुनक हे पंतप्रधानपदासाठी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेतृत्व करत आहेत. या शर्यतीतील यश त्यांना ग्रेट ब्रिटनचे पंतप्रधान बनवेल. पण ब्रिटिश संसद सदस्यांचा पाठिंबा मिळवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते.

Indian origin Rishi Sunak Wins First Round | UK PM News
'डिशी' या टोपण नावाने ओळखले जातात ऋषी सुनक

सुरुवातीच्या छाटणीनंतर मतदानाच्या पहिल्या फेरीत उर्वरित आठ उमेदवारांमध्ये लढत होती. दुसऱ्या फेरीत जाण्यासाठी किमान 30 खासदारांचा पाठिंबा मिळवावा लागेल. सुनक यांना 88 खासदारांनी मतदान केले आहे. गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने शेवटचे दोन उमेदवार निवडले जाणार आहेत. ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानाची निवड 5 सप्टेंबरला होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com