DELTA.jpg 
ग्लोबल

ब्रिटनमध्ये 'डेल्टा' चा प्रसार

गोमंन्तक वृत्तसेवा

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना वेगाने संक्रमण होणाऱ्या 'डेल्टा' (Delta) अथवा बी 1.617.2 या कोविड-19 विषाणू प्रकारचा आता ब्रिटनमध्ये(Britain) वेगाने प्रसार वाढत आहे. त्यामुळे अधिकाधिक कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते, असे ब्रिटनमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

देशाताील आरोग्य अधिकारी कोविड-19 च्या सर्व प्रकारांवर लक्ष ठेवून आहेत. डेल्टा प्रकारची एका आठवड्यात 5472 जणांना लागण झाली असल्याने गुरुवारी कोरोनाबाधितांची एकूण संख्या 12 हजार431 वर पोहोचली आहे. त्यामुळे इंग्लंडमधील केण्ट(Kent) प्रदेशामध्ये प्रथम अल्फा ला मागे टाकण्यापर्यंत डेल्टाचा प्रसार वाढला आहे, असा निष्कर्ष नव्या आकडेवारीनुसार तज्ञांनी काढला आहे. 

ब्रिटनमध्ये या कोरोनाच्या प्रकारचा प्रभाव वाढल्याने आपण शक्य तितकी खबरदारी घेणे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे,असे ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा यंत्रणेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जेनी हॅरिस(Dr. Jenny Harris) यांनी म्हटले आहे. नागरिकांनी शक्य असल्यास घरातूनच काम, वारंवार हात धुणे, वायूविजन याबरोबरच प्राधान्याने लस घेणे गरजेचे आहे, असेही डॉ. हॅरिस यांनी म्हटले आहे.

फ्रान्स अनलॉक ; भारतासह 16 देशांवर निर्बंध कायम
कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे परदेशी पर्यटकावंर घातलेली बंदी फ्रान्स सरकारने(Government of France) उठवण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरातील ज्या पर्यटकांनी कोरोनाची लस घेतली आहे अशा पर्यटकांना फ्रान्सने येत्या बुधवारपासून पर्यटनासाठी परवानगी दिली आहे. मात्र रेड यादीत असलेल्या भारतासह 16 देशांवरील निर्बंध मात्र कायम ठेवले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आहे अशा देशांना लाल यादीत गणले जात आहेत त्याच्यांसाठी बंदी कायम असणार आहे. यामध्ये ब्राझिल, भारत आणि दक्षिण आफ्रिकेसह 16 देशांचा समावेश आहे. मात्र दुसरीकडे युरोपबाहेरील अमेरिका आणि ब्रिटनसह नारंगी यादीत समावेश असलेल्या पर्यटकांसाठी फ्रान्स नियम शिथिल करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला आहे. तसेच त्यांना विलगीकरणात राहण्याची आवश्यकता नाही. मात्र त्यांना फ्रान्समध्ये प्रवास करण्याचे कारण स्पष्ट करावे लागणार आहे. त्यासाठी 72 तासांपूर्वी आरटीपीसीआर चाचणी 48 तासांपूर्वी प्रतिजन चाचणी केलेली नसावी अशी अट कायम असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Damodar Saptah: जय जय रामकृष्ण हरी! दामोदर भजनी सप्ताह; 24 तास साखळी पद्धतीने भजनाची परंपरा

Goa Road Safety: '20 कोटी' दंड वसूल, मग अपघातप्रवण क्षेत्रे का सुधारली नाहीत? आलेमाव यांचा विधानसभेत सवाल

Goa Government Homes: दिलासा! गोव्यात बेघर लोकांना मिळणार हक्काचे घर; CM सावंतांची घोषणा

Goa Government Jobs: गोव्यातील सरकारी खात्‍यांत 2618 पदे रिक्त; वीज, वन, सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये सर्वाधिक पदे

Rashi Bhavishya 29 July 2025: भावनिक अस्थिरता जाणवेल, आर्थिक बाबतीत नवीन संधी येतील; नव्या जबाबदाऱ्यांचं स्वागत करा

SCROLL FOR NEXT