Train Accident Dainik Gomantak
ग्लोबल

Train Accident: दोन हाय-स्पीड ट्रेनची समोरासमोर जोरदार धडक, 46 प्रवाशांचा जागीच मृत्यू; अनेकजण जखमी VIDEO

Spain Train Accident Toledo High Speed Collision: स्पेनमधून भीषण रेल्वे अपघाताची घटना समोर आली. बुधवारी (28 ऑक्टोबर) सकाळी दोन हाय-स्पीड ट्रेनमध्ये झालेल्या जोरदार धडकेत 46 प्रवाशांचा मृत्यू झाला.

Manish Jadhav

Spain Train Accident Toledo High Speed Collision: स्पेनमधून भीषण रेल्वे अपघाताची घटना समोर आली. बुधवारी (28 ऑक्टोबर) सकाळी दोन हाय-स्पीड ट्रेनमध्ये झालेल्या जोरदार धडकेत 46 प्रवाशांचा मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रेनच्या अनेक बोगी चक्काचूर झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात टोलेडो प्रांतातील लॉस येबेनेस आणि उर्दा शहरांच्या दरम्यान झाला.

स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास दोन्ही हाय-स्पीड ट्रेन एकमेकांवर आदळल्या. अपघाताच्या (Accident) सुरुवातीला 10 आणि नंतर 39 जणांच्या मृत्यूची माहिती समोर येत होती, परंतु नंतर हा आकडा वाढून 46 वर पोहोचल्याची पुष्टी झाली. या घटनेत अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

स्पेनच्या सरकारी रेल्वे नेटवर्क ऑपरेटर 'अदिफ'ने या दुर्घटनेला दुजोरा दिला. सोशल मीडियावरुन माहिती देताना त्यांनी सांगितले की, या धडकेमुळे राजधानी माद्रिदला दक्षिण अंदालुसिया क्षेत्राशी जोडणाऱ्या प्रमुख हाय-स्पीड रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाची बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून मदत कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. ट्रॅकवरील बोगी बाजूला करण्याचे काम वेगाने सुरु असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या मार्गावरील इतर सर्व ट्रेन्स तात्पुरत्या थांबवण्यात आल्या आहेत. तसेच, या अपघाताचे नेमके तांत्रिक कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरु करण्यात आला.

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, "टोलेडोमधील या गंभीर रेल्वे अपघाताने मला प्रचंड धक्का बसला. घटनास्थळी बाधित लोकांना सर्वतोपरी मदत केली जात आहे." पंतप्रधान वाहतूक मंत्री आणि प्रांतीय प्रशासनाशी सतत संपर्कात आहेत. दरम्यान, स्पेनमध्ये रेल्वे अपघातांची मालिका यापूर्वीही पाहायला मिळाली. या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये दक्षिण स्पेनमध्ये ट्रेन रुळावरुन घसरुन समोरुन येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनला धडकली होती, ज्यामध्ये 45 जणांचा मृत्यू झाला होता. 2013च्या भीषण अपघातानंतरचा हा स्पेनमधील सर्वात मोठा रेल्वे अपघात मानला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICC Ranking मध्ये मोठी उलथापालथ! इशान किशनला मागे टाकत अभिषेक शर्मा टी-20चा नवा किंग; पटकावले अव्वल स्थान

FD Maturity Rules: मुदतपूर्तीनंतर एफडीचे पैसे काढले नाहीत तर काय होते? जाणून घ्या रिझर्व्ह बँकेचा मोठा नियम

Nigeria Crime News: जीव वाचवण्यासाठी लोकांनी नदीत घेतल्या उड्या, बंदूकधाऱ्यांचा हैदोस! नायजेरियातील भीषण हल्ल्यात 62 जणांचा मृत्यू; हजारो बेघर

Goa Agriculture News: डिचोलीत भातकापणीला वेग; अवकाळी पावसामुळे यंदा उत्पादनात 50 टक्के घट होण्याची शक्यता

Neeraj Yadav Demise: भारतानं गमावला हिरा! तीन वेळचा पॅरा आशियाई सुवर्णपदक विजेता नीरज यादवचं निधन; विष प्राशन करुन संपवलं जीवन

SCROLL FOR NEXT