Bihar Statue 
ग्लोबल

स्पेनमध्ये 'बिहार' चर्चेत; पाण्यात बुडणाऱ्या मूर्तीमार्फत दिलाय मोठा संदेश

जर जीवन जगण्याचा मार्ग वेळेत बदलला नाही, तर मानवाला बुडण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही.

दैनिक गोमन्तक

स्पेनमध्ये (Spain) बुडणाऱ्या मुलीच्या मूर्तिमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही मूर्ती येथील बिलबाओ (Bilbao) शहरातील नॉर्वियन नदीमध्ये (Norwegian River बुडताना दिसत आहे. विशेष म्हणजे या मूर्तीचे नाव 'बिहार' असे देण्यात आले आहे. बिहार शब्दाचा (Bihar Statue) स्थानिक भाषेतील अर्थ 'उद्या' असा होतो. मूर्ती पाहण्यासाठी बरेच स्थानिक लोक जमत आहेत. हा संदेश बिहारच्या माध्यमातून दिला जात आहे, जर जीवन जगण्याचा मार्ग वेळेत बदलला नाही तर मानवाला बुडण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही.

मूर्तीच्या माध्यमातून लोकांना हवामान बदलाबाबत सावध केले जात आहे. त्यांना पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे आवाहनही या माध्यमातून केले जात आहे. ही मूर्ती मेक्सिकन कलाकार रुबेन ओरोझको (Ruben Orozco) यांनी फायबरग्लासपासून बनवली आहे. मुलीच्या चेहऱ्याच्या मूर्तीमध्ये मोठे डोळे दाखवण्यात आले आहेत. हे एका मोहिमेअंतर्गत बनवण्यात आली असून, ज्याची सुरुवात बीबीके नावाच्या फाउंडेशनने केली आहे. बीबीके स्थिरता आणि हवामान बदलावर काम करते.

रात्री समुद्रात फेकले

बीबीके, हवामान बदल कार्यकर्ते म्हणतात, 'कलेचा मूळ उद्देश अर्थात आपण अस्थिर मॉडेल्सवर विश्वास ठेवून त्याची स्पष्टता करणे हा आहे.' रात्री मूर्ती समुद्रात खाली उतरवण्यात आली. जेव्हा लोकांनी सकाळी ती मूर्ती पाहिली, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. (Bilbao Drowning Girl Statue). आता त्या मुलीची मूर्ती पाहण्यासाठी लोक दूरदूरवरुन येत आहेत. स्पॅनिश न्यूज वेबसाईटशी बोलताना ओरोझको म्हणाले की, मूर्तीचा हेतू लोकांना याची जाणीव करुन देणे आहे की, आपण बुडू पण शकतो किंवा त्यामधून वाचूही शकतो.

'बिहार' पाहून लोक अस्वस्थ झाले

सुरुवातीला, लोक मूर्ती पाहून अस्वस्थ झाले आहेत. मूर्तीच्या माध्यमातून काय सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे अद्याप कोणालाही समजू शकलेले नाही. परंतु हळूहळू प्रत्येकाला त्याचा अर्थ समजला (River Nervion Statue). एक महिला म्हणाली, 'हे थोडे भीतीदायकही असून विलक्षण आहे. आता लाटा थोड्याशा कमी झाल्या असून त्या पुन्हा वाढू शकतात. आणि तुम्ही हे देखील घडताना पाहू शकता. ती मुलगी खरोखर दिसते, जणू कोणी तिला प्रत्यक्षात बुडवत आहे. 'ही मूर्ती दोन मीटर उंचीची असून सप्टेंबरमध्ये नदीत ठेवण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT