South Africa Bar Shooting: Dainik Gomantak
ग्लोबल

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

Johannesburg bar shooting: दक्षिण आफ्रिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची गंभीर घटना समोर आली आहे. जोहान्सबर्गच्या नैऋत्य भागातील गौतेंग प्रांतातील वेडेला टाउनशिप परिसरात एका नाईट बारमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.

Sameer Amunekar

दक्षिण आफ्रिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची गंभीर घटना समोर आली आहे. जोहान्सबर्गच्या नैऋत्य भागातील गौतेंग प्रांतातील वेडेला टाउनशिप परिसरात एका नाईट बारमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या घटनेत 17 जणांचा मृत्यू, तर 15 जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये 13 पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे.

ही घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. नाईट बारमध्ये लोकांची गर्दी असताना सशस्त्र हल्लेखोरांनी अचानक गोळीबार सुरू केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.

रायफल आणि पिस्तुलांचा वापर

प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांकडे AK-47 रायफल आणि पिस्तुले होती. त्यांनी बारमधील उपस्थितांवर गोळीबार केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि अनेकांनी जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळ काढला.

गोळीबाराची माहिती मिळताच दक्षिण आफ्रिकन पोलिस सेवा (SAPS) आणि आपत्कालीन वैद्यकीय पथके घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आठ संशयित हल्लेखोरांचा शोध

घटनेतून बचावलेल्या काही जखमींच्या प्राथमिक माहितीनुसार, या हल्ल्यात सुमारे आठ जण सहभागी असल्याचा संशय आहे. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.

गोळीबारानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरील काही लोकांचे मोबाइल फोन घेतले आणि दोन वाहनांमधून तेथून पळ काढल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

CCTV फुटेजच्या आधारे तपास

पोलिसांकडून नाईट बार तसेच आसपासच्या परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहे. त्यातून संशयितांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या घटनेमागे वैयक्तिक वाद, गुन्हेगारी टोळ्यांमधील संघर्ष किंवा अन्य कोणते कारण आहे, याबाबत तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिक स्पष्ट माहिती समोर येऊ शकते.

दक्षिण आफ्रिकेत वाढत्या गोळीबाराच्या घटनांची चिंता

दक्षिण आफ्रिकेत सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमुळे सुरक्षा व्यवस्थेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अलीकडेच डरबनमध्ये एका घरावर झालेल्या गोळीबारात गर्भवती महिलेसह 11 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते.

जून 2026 मध्ये जोहान्सबर्गमधील एका वस्तीत झालेल्या गोळीबारात 12 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ताज्या घटनेने पोलिसांसमोरील चिंता आणखी वाढली आहे.

हल्ल्यामागचे कारण अद्याप गूढ

ताज्या घटनेत 17 जणांचा मृत्यू झाल्याने तपास यंत्रणांवर संशयितांना शोधण्याबरोबरच हल्ल्यामागील कारण शोधण्याची जबाबदारी आहे. पोलिसांकडून CCTV, प्रत्यक्षदर्शी आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे तपास सुरू आहे.

सध्या या हल्ल्यातील संशयित मोकाट असून त्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT