Sonam Wangchuk during his hunger strike protest in New Delhi Dainik Gomantak
ग्लोबल

Sonam Wangchuk Hunger Strike: "मी भूत बनून परत येईन...", सोनम वांगचुक यांचा थेट इशारा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम

Sonam Wangchuk Hunger Strike Neet Paper Leak: नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट-युजी पेपरफुटी प्रकरणाविरोधात उपोषणाला बसलेले प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आता 20 दिवस पूर्ण होत आले आहेत.

Manish Jadhav

Sonam Wangchuk Hunger Strike Neet Paper Leak: नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट-युजी पेपरफुटी प्रकरणाविरोधात उपोषणाला बसलेले प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आता 20 दिवस पूर्ण होत आले आहेत. सोशल मीडियावर एकीकडे त्यांच्या खालावत्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे, तर दुसरीकडे काही समाजकंटकांकडून त्यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवणारे मीम्स बनवले जात आहेत.

मात्र, विरोधी परिस्थितीतही हसतमुख राहणाऱ्या वांगचुक यांनी अत्यंत अशक्त अवस्थेत असतानाही एक मजेशीर विधान केले, ज्याने त्यांच्या आजूबाजूला उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकला. वांगचुक यांनी स्पष्ट केले की, ते आपले उपोषण 20 जुलैपर्यंत सुरुच ठेवतील आणि त्या दिवशी संसदेवर (Parliament) काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चाचे स्वतः नेतृत्व करतील. जंतर-मंतरवर समर्थकांना संबोधित करताना त्यांनी चेतावणीच्या सुरात म्हटले की, "जर हा मोर्चा यशस्वी झाला नाही, तर मी भूत बनून परत येईन."

वांगचुक यांची खालावती तब्येत पाहून समाजातील विविध स्तरातून त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण व्यवस्थेतील गैरव्यवहाराची आणि अनियमिततेची नैतिक जबाबदारी स्वीकारुन आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. वैद्यकीय पथकाने जारी केलेल्या ताज्या हेल्थ बुलेटिननुसार, वांगचुक यांचे वजन आता केवळ 56.65 किलोग्रॅम इतके आहे. गेल्या 24 तासांत त्यांचे अर्धा किलो वजन घटले असून, उपोषण सुरु केल्यापासून आतापर्यंत त्यांचे एकूण 9 किलो वजन कमी झाले आहे. डॉक्टरांनी त्यांच्या शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होण्याची भीती व्यक्त केली.

असे असतानाही वांगचुक यांनी समर्थकांना आवाहन केले की, त्यांनी स्वतःच्या आरोग्यापेक्षा 20 जुलैचा संसदेवरील मोर्चा यशस्वी करण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावावी. ते म्हणाले की, शरीर थकले असले तरी त्यांचे मनोबल अधिक दृढ झाले आहे. वांगचुक यांनी यापूर्वी एका व्हिडिओ संदेशात स्पष्ट केले होते की, या आंदोलनाला केवळ सहानुभूतीची गरज नसून थेट जनसामान्यांच्या सहभागाची गरज आहे. त्यामुळे लोकांनी मला उपोषण सोडण्यास सांगण्याऐवजी 20 जुलैच्या संसदेवरील आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. या निमित्ताने पेपरफुटीविरोधातील हा लढा आता अधिक तीव्र होताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT