Germany Shooting Dainik Gomantak
ग्लोबल

Germany Shooting: जर्मनीच्या हॅम्बर्ग चर्चमध्ये बेछुट गोळीबार; 6 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

जर्मनीच्या हॅम्बर्ग शहरात एका चर्चमध्ये बेछुट गोळीबार करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

Shooting in Hamburg Germany: जर्मनीच्या हॅम्बर्ग शहरातून बेछुट गोळीबीराची घटना समोर आली आहे. हॅम्बर्गमधील एका चर्चमध्ये अचानक गोळीबार झाला. या घटनेत तब्बल 24 लोक लोक गंभीर जखमी झाले आहेत.

तर तब्बल सहा जणांना जीव गमवावा लागला आहे. जर्मन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सव्वा नऊच्या सुमारास गोळीबार झाला. दरम्यान, पोलिसांनी स्थानिकांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे. तसेच, घरातच राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. 

"प्राथमिक माहितीनुसार, ग्रोसबोरस्टेल जिल्ह्यातील डेलबोझ स्ट्रीट येथील चर्चमध्ये गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात अनेक लोक गंभीर जखमी झाले, काहींना प्राणही गमवावे लागले." दरम्यान, पोलिसांनी या भागातील नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी रात्री सव्वा नऊच्या सुमारास चर्चमधील लोकांवर गोळीबार केला. पण हल्लेखोर किती होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. 

जर्मन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. लोकांना या परिसरापासून दूर राहण्यास सांगितले आहे. या संदर्भातील मॅसेजही लोकांच्या मोबाईलवर पाठवण्यात आले आहेत.

स्थानिक रहिवाशांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, अगदी आवश्यक असेल तेव्हाच फोन वापरण्यास सांगण्यात आले आहे. या घटनेबाबत पोलीसांचा तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT