China Population Dainik Gomantak
ग्लोबल

China: चीनमध्ये आता अविवाहित महिलाही मुलांना जन्म देऊ शकणार, वृद्धांची संख्या वाढल्याने सरकार चिंतेत

चीन सरकार जन्म नोंदणीचा ​​कायदा देशभरात लागू करण्याचा विचार करत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

चीन सरकार सध्या देशातील घटत्या जन्मदरामुळे चिंतेत आहे. तेथील सरकार जन्मदर वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. दरम्यान, सरकारने फेब्रुवारीमध्ये अविवाहित महिलांना मुले जन्माला घालण्यासाठी नोंदणी करण्याचा नियम कायदेशीर केला आहे. याचा अर्थ असा की चीनमधील अविवाहित महिलांना आता गरोदर राहिल्यानंतर सशुल्क रजा आणि अनुदान मिळू शकते.

चीनच्या नैऋत्य सिचुआन प्रांताची राजधानी चेंगडू येथील रहिवासी चेन लुओजिन या नोंदणीचा ​​भाग असणार आहेत. चीन सरकार जन्म नोंदणीचा ​​कायदा देशभरात लागू करण्याचा विचार करत आहे.

चीनमध्ये गेल्या 60 वर्षांत पहिल्यांदाच लोकसंख्या घटली आहे. चीनमध्ये अधिक वय असलेल्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या चिंतेत असलेल्या देशाचे सरकार मार्च महिन्यापासून इन-व्हिट्रो फर्टिलिटी (IVF) शी संबंधित सेवा सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहे.

यामुळे देशभरात इन-व्हिट्रो फर्टिलिटीच्या मदतीने प्रजनन दर वाढण्यास मदत होईल. याकडे एक व्यवसाय म्हणूनही पाहिले जात आहे, कारण ती आधीच जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. इनव्हो बायोसायन्स (INVO.O) मधील एशिया पॅसिफिकसाठी व्यवसाय विकास संचालक, यवेस लिप्पेन्स म्हणाले की, जर चीनने एकल महिलांना मुले जन्माला घालण्याची परवानगी देण्याचे धोरण बदलले तर त्याचा परिणाम आयव्हीएफच्या मागणीत वाढ होऊ शकतो.

इन-व्हिट्रो फर्टिलिटी (IVF) हे एक उपचार तंत्र आहे ज्यामध्ये प्रयोगशाळेत स्त्रीचे बीजांड आणि पुरुषाचे शुक्राणू यांचे फलन करून गर्भ तयार केला जातो.

चीन सरकारने अविवाहित महिलांसाठी IVF उपचार कायदेशीर केले तर चीनमध्ये IVF ची मागणी वाढेल अशी अपेक्षा आहे. ज्या स्त्रिया अविवाहित आहेत आणि लग्न करू इच्छित नाहीत त्या देखील IVF द्वारे सहजपणे माता बनू शकतात.

चीनमध्ये सध्या 539 खाजगी आणि सरकारी IVF क्लिनिक आहेत आणि 2025 पर्यंत चीन सरकार दर 2.3 दशलक्ष लोकांसाठी एक IVF क्लिनिक उघडण्याचा विचार करत आहे. तसेच, 2025 पर्यंत चीनमधील IVF बाजार 85 अब्ज युआनपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

चीनची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे आणि त्याचवेळी देशातील वृद्धांची संख्याही वाढत आहे. त्यामुळेच चिनी सरकार लोकांना मुलं जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहन देत आहे, पण लग्न आणि मुलांचे संगोपन यावर होणारा खर्च लक्षात घेता चिनी लोक मूल होण्यास टाळाटाळ करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sarfaraz Alam Film: ज्या शिक्षकांनी घडवले डॉक्टर, अभियंते, आयएएस; त्यांनाच स्मार्ट बोर्डच्या युगात जुळवून घेताना संघर्ष

X Post Scheduling Feature: WhatsApp नंतर आता X वरही भन्नाट फीचर! युजर्संना 18 महिने आधी पोस्ट शेड्यूल करता येणार; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग 2028 पर्यंत टळल्यास मोठा फटका? थकबाकीमुळे बिघडू शकतो हिशोब; अहवालात समोर आली महत्त्वाची माहिती

Goa Shipyard Dredger Launch: आंतरराष्ट्रीय जहाजबांधणीत गोवा शिपयार्डची झेप; अत्याधुनिक हायब्रीड ड्रेजरचे यशस्वी लॉन्चिंग

High Tide Waterlogging: खाडीच्या पाण्याचा नेवगीनगरला वेढा; महानगरपालिका कायमस्वरूपी उपाय कधी करणार?

SCROLL FOR NEXT