Four Day Workweek Singapore Dainik Gomatak
ग्लोबल

Singapore: चार दिवसांचा आठवडा करणारा सिंगापूर बनला आशिया खंडातील पहिला देश; महिलांना हवी तेव्हा घेता येते सुट्टी

Four Day Workweek Singapore: सिंगापूर हा आशियातील पहिला देश बनला आहे, जिथे आता आठवड्यातून चार दिवस काम करण्याची परवानगी आहे.

Manish Jadhav

Four Day Workweek Singapore: सिंगापूर हा आशियातील पहिला देश बनला आहे, जिथे आता आठवड्यातून चार दिवस काम करण्याची परवानगी आहे. नवीन दिशानिर्देश 1 डिसेंबर 2024 रोजी लागू होतील. यासोबतच कर्मचाऱ्यांना अधिकाधिक घरुन काम करण्याची आणि त्यांच्या आवडीनुसार शिफ्टमध्ये काम करण्याची संधी मिळेल.

आठवड्यातून चार दिवस काम करावे लागणार

दरम्यान, हा निर्णय घेऊन सिंगापूर सरकारने युनायटेड किंगडम आणि आयर्लंड, फिनलंड, पोर्तुगाल आणि बेल्जियम सारख्या देशांच्या यादीत सामील झाले आहे, जिथे कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेळेनुसार काम करण्याची परवानगी दिली जाते.

सर्वेक्षणात लोकांनी मागणी केली होती

सिंगापूरमध्ये केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले की, अधिकारी आणि कर्मचारी पगार आणि नोकरीच्या सुरक्षिततेनंतर नोकरीमध्ये फ्लेक्सिबिलिटी हा तिसरा महत्त्वाचा घटक मानतात. अशा परिस्थितीत त्यांना आणखी आकर्षित करण्यासाठी त्यांची मागणी मान्य करण्यात आली आहे. दरम्यान, सरकारच्या या नियमानंतर कर्मचाऱ्यांची मनमानी सुरु होईल, असे नाही.

माहितीनुसार, कंपनीचा मालक किंवा बॉस तुमची रजा किंवा इतर सुविधा रद्द करु शकतात, जर त्यांना त्याची गरज वाटली तर. मात्र, त्यासाठी ते आम्ही या कायद्याचे पालन करु शकत नाही किंवा ते आमच्यासाठी फायदेशीर नाही, असे कारण देऊ शकत नाहीत. इतकंच नाही तर नवीन दिशानिर्देशांमध्ये महिला आणि वृद्ध कर्मचाऱ्यांना जास्त रजा घेण्याचाही उल्लेख आहे. त्यांना दीर्घकाळ घरुन काम करण्याचा अधिकारही असेल. एवढेच नाही तर कर्मचाऱ्यांच्या सोयी लक्षात घेऊन घरुन काम करण्यावरही भर दिला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abrar Ahmed Controversy: "टीम इंडियाच्या 'त्या' खेळाडूला मारायचंय..."; 'जा जा जा' करणारा पाकिस्तानचा खेळाडू पुन्हा वादात, कोणाला दिली धमकी?

'सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही'; सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकिलाकडून हल्ल्याचा प्रयत्न

"जेवढं अंतर जास्ती, तेवढं लग्न यशस्वी", 58व्या वर्षी अरबाज खानला 'कन्यारत्न'; शूरा खानचं वय काय?

Goa AAP: अरविंद केजरीवाल गोव्यात असतानाच 'आप'ला मोठा फटका; बाणावलीतील दोन मोठ्या नेत्यांसह समर्थकांचा राजीनामा

Vasco: वास्कोत वाहतूक व्यवस्था कोलमडली! रस्त्याकडेला वाहने पार्क; खात्याने लक्ष देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT