Sierra Leone Declares Emergency Over Drug Abuse Dainik Gomantak
ग्लोबल

मानवी हाडांपासून बनणारं ड्रग्ज बनलं ''मृत्यूचा सापळा''; या देशात राष्ट्रीय आणिबाणी जाहीर

Sierra Leone Declares Emergency Over Drug Abuse: पश्चिम आफ्रिकेत असलेल्या सिएरा लिओनच्या (Sierra Leone) राष्ट्राध्यक्षांनी एका ड्रगमुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे.

Manish Jadhav

Sierra Leone Declares Emergency Over Drug Abuse: पश्चिम आफ्रिकेत असलेल्या सिएरा लिओनच्या (Sierra Leone) राष्ट्राध्यक्षांनी एका ड्रग्जमुळे राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. या ड्रग्जचे नाव 'कुश' (Kush) आहे, जे एडिक्टिव्ह पदार्थांचे सायकोएक्टिव्ह मिश्रण आहे. हे ड्रग्ज या देशात अनेक वर्षांपासून लोकांना व्यसनाधीन बनवत आहे. अध्यक्ष ज्युलियस माडा बायो यांनी या ड्रग्जचे वर्णन 'मृत्यू सापळा' असे केले. बायो म्हणाले की, यामुळे 'अस्तित्वाचे संकट' निर्माण झाले आहे.

दरम्यान, हे ड्रग्ज बनवण्यासाठी वापरण्यात येणारे एक साहित्य म्हणजे 'मानवी हाडे'. व्यसनाधीन लोक कबरी खोदताना दिसले. हे थांबवण्यासाठी स्मशानभूमींमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, सिएरा लिओनमध्ये रस्त्याच्या कडेला बसलेले लोक पाहणे सामान्य आहे, ज्यांचे अवयव या ड्रग्जच्या अतिसेवनामुळे सुजले आहेत. एका व्यसनाधीन व्यक्तीने सांगितले की, मला ते आवडत नाही, पण मला ते सोडताही येत नाही.

गेल्या काही महिन्यांत शेकडो लोकांना जीव गमवावा लागला

दुसरीकडे, या ड्रग्जमुळे किती लोकांचा मृत्यू झाला आहे याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. पण बीबीसीच्या वृत्तानुसार, एका डॉक्टरने सांगितले की, राजधानी फ्रीटाऊनमध्ये गेल्या काही महिन्यांत शेकडो तरुणांचा मृत्यू झाला आहे. अति प्रमाणात ड्रग्जचे सेवन केल्यामुळे त्यांचे अवयव काम करणे बंद झाले होते त्यामुळे त्यांना प्राण गमवावे लागले. शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांसोबतच या ड्रग्जचा माणसाच्या मानसिक आरोग्यावरही खूप वाईट परिणाम होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

3 वर्षात 4000 टक्क्यांनी वाढ रुग्णांची संख्या

सिएरा लिओनमधील साइकिएट्रिक हॉस्पिटलचे म्हणणे आहे की, 2020 ते 2023 दरम्यान कुश या ड्रग्जमुळे दाखल झालेल्या लोकांची संख्या 4000 टक्क्यांनी वाढली आहे. अशा प्रकारचे हे देशातील एकमेव रुग्णालय आहे. त्याचा वापर वाढल्याने फ्रीटाऊनच्या स्मशानभूमीत काम करणाऱ्यांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. अध्यक्ष बायो यांनी गुरुवारी रात्री एका भाषणात सांगितले की, या ड्रग्जमुळे आपला देश सध्या अस्तित्वाच्या संकटाचा सामना करत आहे.

संकटाचा सामना करण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्याच्या सूचना

राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करताना राष्ट्रध्यक्ष बायो म्हणाले की, त्याचा दुरुपयोग रोखण्यासाठी राष्ट्रीय टास्क फोर्स तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या टास्क फोर्समध्ये प्रामुख्याने कुश संकटाचा सामना करण्यावर भर असेल. प्रत्येक जिल्ह्यात केंद्रे स्थापन केली जातील, ज्यामध्ये प्रशिक्षित प्रोफेशनल्स व्यसनाधीन लोकांना मदत करतील. सध्या फ्रीटाऊन हे या देशातील एकमेव शहर आहे, जिथे ड्रग रिहॅबिलिटेशन सेंटर कार्यरत आहे. ते यावर्षी लष्कराच्या प्रशिक्षण केंद्रात बांधले गेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT