Ship Attack: जगात रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरु आहे. या युद्धाची धग आता समुद्रापर्यंत पोहोचली आहे. दोन दिवसांत समुद्रात एकापाठोपाठ एक असे अनेक हल्ले झाले आहेत. यावेळी हल्लेखोरांनी लाल समुद्रातील दोन जहाजांना लक्ष्य केले आहे. त्यांनी कच्च्या तेलाने भरलेल्या टँकरवर ड्रोन हल्ले केले आहेत. भारताच्या सुरक्षा यंत्रणाही याबाबत सतर्क झाल्या आहेत. येमेनच्या हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातील दोन जहाजांवर ड्रोनने हल्ला केल्याचा दावा अमेरिकन लष्कराने केला आहे. या जहाजामध्ये कच्च्या तेलाने भरलेले टँकर होते. या टँकरवर भारताचा झेंडा लावण्यात आला होता, मात्र नंतर हे चुकीचे सिद्ध झाले. या हल्ल्याची माहिती मिळताच अमेरिकन युद्धनौका घटनास्थळी पोहोचली. मात्र, या हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.
दरम्यान, लाल समुद्रात जहाजावर झालेल्या हल्ल्याबाबत भारतीय नौदलाने आपले निवेदन जारी केले आहे. भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, लाल समुद्रात ड्रोनने हल्ला केलेल्या एमव्ही साईबाबा जहाजावर गॅबन देशाचा ध्वज होता. या जहाजात 25 भारतीय होते, ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. या जहाजावर भारतीय तिरंगा लावण्यात आलेला नाही, असे ते म्हणाले.
शनिवारी रात्री 10.30 वाजता दक्षिण लाल समुद्रात तेलवाहक जहाज MV साईबाबावर हल्ला करण्यात आला. याबाबत अमेरिकेने सांगितले की, हुथी बंडखोरांनी ही घटना घडवून आणली आहे. हे जहाज मध्य आफ्रिकन देश गॅबॉन येथील कंपनीचे होते. या घटनेची माहिती सर्वप्रथम अमेरिकेला देण्यात आली.
हुथी बंडखोरांना इराणचा पाठिंबा आहे. याआधी इराणने भारतात येणाऱ्या एका समुद्री जहाजावर हल्ला केल्याचा आरोप आहे आणि त्यानंतरच हुथी बंडखोरांनी लाल समुद्रात एकामागून एक दोन जहाजांनाही लक्ष्य केले आहे. समुद्रात सतत होणाऱ्या हल्ल्यांबाबत असे बोलले जात आहे की, हे देश बंडखोर गाझाच्या समर्थनार्थ आणि इस्रायलच्या विरोधात हल्ले करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.