Shehbaz Sharif  Dainik Gomantak
ग्लोबल

शाहबाज शरीफ बनले पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ यांची बिनविरोध निवड झाल्याने इम्रान खान यांच्या पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. पाकिस्तानमध्ये (Pakistan) नवीन पंतप्रधान निवडण्यासाठी संसदेचे अधिवेशन सुरु होते. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (PML-N) चे अध्यक्ष शाहबाज शरीफ, इम्रान खान (Imran Khan) यांना सत्तेतून काढून टाकल्यानंतर पंतप्रधानपदाचे उमेदवार मानले जात होते. गेल्या काही वर्षांत शाहबाज शरीफ यांची ओळख स्पष्टवक्ता राजकारणी म्हणून निर्माण झाली आहे. (Shehbaz Sharif becomes the new Prime Minister of Pakistan)

दरम्यान, गेल्या काही वर्षांत शाहबाज शरीफ यांची ओळख स्पष्टवक्ता राजकारणी म्हणून निर्माण झाली आहे. तीन वेळा पंतप्रधान राहीलेले नवाझ शरीफ यांचे ७० वर्षीय धाकटे भाऊ शाहबाज हे देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या पंजाब प्रांताचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांचा पक्ष पीएमएल-एन - विशेषत: त्यांचे सुप्रीमो नवाझ शरीफ यांनी पंतप्रधानपदासाठी त्यांच्या नावावर सहमती दर्शविण्याची ही पहिलीच वेळ आहे. माजी अध्यक्ष आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (PPP) सह-अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी संयुक्त बैठकीत शाहबाज यांच्या नावाचा पंतप्रधानपदासाठी प्रस्ताव ठेवला होता. शनिवारी उशिरा संसदेचे कनिष्ठ सभागृह असणाऱ्या नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास प्रस्तावाद्वारे इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरुन हटवण्यात आले.

तसेच, तहरीक-ए इन्साफचे पंतप्रधानपदाचे उमेदवार शाह मेहमूह कुरेशी यांनी पंतप्रधान निवडीसाठी मतदानावर बहिष्कार टाकला. पाकिस्तानमध्ये नवीन पंतप्रधान निवडीपूर्वी, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाने संसदेचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. एआरवाय न्यूजनुसार, इम्रान खान यांनी यापूर्वी सांगितले होते की, आम्ही ‘चोरांसोबत’ सभागृहात बसणार नाही.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Thivim MIT University: थिवी विद्यापीठासाठी 1 हजार 149 झाडे तोडणार, गोवा राज्य वृक्ष प्राधिकरणाकडून मंजुरी

Mopa Airport: गोव्यात Air India विमानाचा मोठा अनर्थ टळला! रन-वे सोडून केला टॅक्सी-वेवरून उड्डाणाचा प्रयत्न

Viral Video: थरारक...! जंगल सफारीचा रोमांचक अनुभव, चिडलेल्या गेंड्याचा गाडीवर हल्ला; थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल

Elvish Yadav: "अनेक घरे उद्ध्वस्त केली..." भाऊ गँगने एल्विश यादवच्या घरावर झाडल्या गोळ्या; पोस्ट करत दिली माहिती, हल्ल्याचे कारणही सांगितले

Goa Live News: सरकारी प्राथमिक शिक्षक सरकारी पतसंस्थेतर्फे निवृत्त शिक्षकांचा गौरव सोहळा

SCROLL FOR NEXT