Arrested  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: '700 भारतीय PAK च्या तुरुंगात बंद, काही वेडे झाले...', भारतात परतलेल्या कैद्याचा खुलासा

Pakistan News: पाकिस्तान सरकारने मंगळवारी अटारी-वाघा सीमेवरुन दोन भारतीय कैद्यांची सुटका करुन त्यांना भारतात परत पाठवले.

Manish Jadhav

Indian Prisoners In Pakistani Jails: पाकिस्तान सरकारने मंगळवारी अटारी-वाघा सीमेवरुन दोन भारतीय कैद्यांची सुटका करुन त्यांना भारतात परत पाठवले. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, एका कैद्याने सांगितले की, सुमारे 700 भारतीय पाकिस्तानमध्ये त्यांची शिक्षा भोगत आहेत.

प्रोटोकॉल अधिकारी अरुण पाल यांच्या म्हणण्यानुसार, राजू पाच वर्षांपूर्वी चुकून पाकिस्तानात गेला होता. तर दुसरा कैदी गेम्ब्रा राम सुमारे अडीच वर्षे पाकिस्तानच्या (Pakistan) तुरुंगात होता.

एका मुलीचा पाठलाग करत पाकिस्तानात पोहोचला होता

एका मुलीचा पाठलाग करत पाकिस्तानची सीमा ओलांडली होती, असे गेम्ब्रा रामने सांगितले. तो म्हणाला की, 'मी एका मुलीचा पाठलाग करण्यासाठी पाकिस्तानची सीमा ओलांडली. तिथे पोहोचल्यावर सहा महिने मला खूप छळले. सहा महिन्यांनंतर, मला दुसर्‍या तुरुंगात पाठवण्यात आले, जिथे मी 21 महिने घालवले.'

'मी त्याची प्रकृती सांगू शकत नाही'

गेम्ब्रा राम पुढे म्हणाला की, 'मी ज्या तुरुंगातून आलो आहे, त्या तुरुंगात आणखी 700 भारतीय आहेत. ते वेडे झाले आहेत, खूप रडत आहेत. त्यांच्या प्रकृतीबद्दल मी सांगू शकत नाही.'

असे सरकारला आवाहन

गेम्ब्रा रामने सरकारला (Government) विनंती केली की, सर्व भारतीयांना लवकरात लवकर बाहेर काढावे, कारण अनेक भारतीय कैदी तुरुंगात वेडे झाले आहेत. तिथे त्यांची अवस्था खूप दयनीय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT