Squid Game Dainik Gomantak
ग्लोबल

सौदी अरेबिया करणार ‘Squid Game’ चे आयोजन, 'असे' करणारा जगातील पहिला देश

सौदी अरेबियाची (Saudi Arabia) राजधानी असलेल्या रियाधमध्ये अशा काही कार्यक्रमांचे आयोजन सौदी सरकार करणार आहे, जे केवळ देशातीलच नाही तर जगभरातील लोकांना आकर्षित करेल.

दैनिक गोमन्तक

सौदी अरेबियाची राजधानी असलेल्या रियाधमध्ये अशा काही कार्यक्रमांचे आयोजन सौदी सरकार करणार आहे, जे केवळ देशातीलच नाही तर जगभरातील लोकांना आकर्षित करेल. यादरम्यान रियाधमधील लोकांना स्क्विड गेमचा अनुभव देण्यात येणार आहे. असा अनुभव देणारा सौदी अरेबिया (Saudi Arabia) हा जगातील पहिला देश असणार आहे. जो वेब सिरीज Squid Game वर आधारित लोकांना प्रत्यक्ष जीवनाचा अनुभव देणार आहे. यासाठी 9582 चौरस मीटर क्षेत्रफळ तयार करण्यात आले आहे. जो एक विशेष झोन असेल. (Saudi Arabia Will Host Squid Game The First Country In The World To Do So)

दरम्यान, जनरल अथॉरिटी (GEA) लोकांच्या मनोरंजनासाठी हा कार्यक्रम आयोजित करणार आहे. यामध्ये खेळाडूंना प्रसिद्ध कोरियन वेब सिरीज 'स्क्विड गेम' वरुन प्रेरित अनुभव दिला जाणार आहे. यामध्ये सहा वेगवेगळे खेळ आयोजित केले जाणार आहेत. ज्याची सुरुवात लाल सूटमधील सैनिकांसोबतच्या भेटीने होईल. आणि विजेत्याच्या नावाच्या घोषणेने समाप्त होईल. हा कार्यक्रम रियाधच्या (Riyadh) बुलेव्हार्ड रियाध शहरात होणार आहे. खेळाच्या सहाही स्तरांसाठी वेगवेगळे झोन असलेले हे विशाल क्षेत्र अवघ्या 35 दिवसांत तयार करण्यात आले आहे. जिथे लोक गेम खेळून स्क्विड गेमचा वास्तविक जीवन अनुभव घेऊ शकतील.

तीन मीटरची बाहुली उभारली

हा खेळ पूर्णपणे खरा वाटावा यासाठी तीन मीटर लांबीची बाहुली उभारण्यात आली आहे. तर जमिनीपासून तीन मीटर उंचीवर दोरी ओढण्याचा खेळ खेळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या काळात खेळाडूंच्या सुरक्षेचीही काळजी घेतली जाणार आहे. सुमारे 70 खेळाडू या गेममध्ये भाग घेऊ शकतील. खेळाच्या सुरुवातीला त्यांना पत्ते मिळतील, त्यानंतर ते मास्क घातलेले सैनिक आणि खेळाडू भेटतील, त्यांना कपडे दिले जातील आणि वेगवेगळे खेळ खेळले जातील. सौदी अरेबियातील स्क्विड गेमचा अनुभव शेकडो सौदी रहिवासी आणि पर्यटकांना आकर्षित करत आहे. यासाठी तिकीटांची विक्रीही मोठ्याप्रमाणात होत आहे.

सर्वाधिक पाहिलेला स्क्विड गेम

स्क्विड गेमबद्दल बोलायचे झाले तर, ही सर्वाधिक पाहिली जाणारी वेब सीरिज आहे. अमेरिका आणि ब्रिटनसह 90 देशांमध्ये वेबसीरीजमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. यामध्ये काही लोकांची टोळी पैशासाठी अत्यंत हिंसक खेळ खेळते. मास्क घातलेले पुरुष गेममध्ये पराभूत झालेल्यांना मारतात. आता रियाध सीझन 2021 चे आयोजन 'इमॅजिन मोअर' या घोषवाक्याखाली केले जात आहे. यात स्क्विड गेम आयोजित करणे देखील समाविष्ट आहे, जे की हे सर्व कल्पनेच्या पलीकडे आहे. रियाध सीझन 2021 20 ऑक्टोबर 2021 रोजी सुरु झाला. जिथे 10 लाखांहून अधिक लोक आले आहेत. यावरुन सौदी अरेबिया मनोरंजनाच्या बाबतीत वेगाने पुढे जात असल्याचे दिसून येते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

SCROLL FOR NEXT