travel ban for those visiting India Dainik Gomantak
ग्लोबल

भारतात प्रवास करणाऱ्यावर प्रवाशांवर 'हा' देश घालणार तीन वर्षाची बंदी

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid 19) वाढत असताना दुसरीकडे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सौदी अरेबियाकडून (Saudi Arabia) महत्वाचं पाऊल उचलण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

जगभरात कोरोनाचा संसर्ग (Covid 19) वाढत असताना दुसरीकडे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सौदी अरेबियाकडून (Saudi Arabia) महत्वाचं पाऊल उचलण्यात आले आहे. काही देशांना रेड लिस्टमध्ये टाकले आहे. त्याचबरोबर या देशांमध्ये प्रवेश करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या देशांमध्ये प्रवास करत असणाऱ्या नागरिकांवर तब्बल तीन वर्षांची प्रवासबंदी घालण्यात आली आहे. यासंबंधीची माहिती रॉयटर्स वृत्त संस्थेकडून देण्यात आले आहे.

सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका महत्त्वाच्या अधिकाऱ्याने नाव जाहीर करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, काही सौदी अरेबियाचे नागरिक ज्यांना मे महिन्यात प्रशासनाने कोणत्याही परवानगीशिवाय विदेशात प्रवास करण्याची परवानगी दिली होती त्यांनी प्रवासी नियमांचे उल्लघंन केले आहे. मार्च 2020 नंतर प्रथमच ही परवानगी देण्यात आली होती.

सौदीने अर्जेंटिना, अफगाणिस्तान, ब्राझील, इजिप्त, इथोपिया, भारत, (India) इंडोनेशिया, लेबनॉन, पाकिस्तान, (Pakistan) दक्षिण आफ्रिका, तुर्की, व्हिएतनाम आणि संयुक्त अरब अमिराती या देशामध्ये प्रवास करण्यावर नागरिकांना बंदी घातली आहे. ज्या देशांनी कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवलेले नाही किंवा ज्या देशांमध्ये नव्याने कोरोनाचा फैलाव वाढला आहे किंवा दुसऱ्या देशांमध्ये प्रवास करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

सौदी अरेबियामध्ये मंगळवारी 1379 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 5 लाख 20 हजाराव पोहोचली आहे. तर अद्याप देशात 9189 जणांचे मृत्यू झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Snake Attack Video: साप पकडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद! सापाने अचानक केला हल्ला, नंतर काय घडलं? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहा

Love Horoscope: लग्नाचा विचार करताय? वृषभ राशीच्या लव्ह लाईफमध्ये येणार गोडवा, सुरुवातीचे 6 महिने टाळावा 'हा' मोठा निर्णय

"कधीच विराटला बोलावलं नाही, बोलावणारही नाही!", 'Koffee With Karan'मध्ये कोहलीला 'नो एन्ट्री'; करण जोहरचं धक्कादायक विधान

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

SCROLL FOR NEXT