Hajj Yatra
Hajj Yatra Dainik Gomantak
ग्लोबल

Hajj Yatra 2023: हजसंदर्भात सौदी अरेबियाची मोठी घोषणा, भारतीय मुस्लिमांनाही होणार फायदा

दैनिक गोमन्तक

Saudi Arabia News: जगभरातून हजला जाणाऱ्या यात्रेकरुंसाठी एक आनंदाची बातमी आहे. सौदी अरेबियाने सोमवारी जाहीर केले की, यंदाच्या हजसाठी यात्रेकरुंच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही. अरब न्यूजने देशाचे हज आणि उमराह मंत्री तौफिक अल-रबिया यांच्या हवाल्याने ही माहिती दिली. हज एक्स्पो 2023 मध्ये बोलताना ते म्हणाले की, यावर्षी हजमध्ये सहभागी होणार्‍या लोकांची संख्या महामारीपूर्वीच्या पातळीवर परत येईल आणि यावर्षी हज यात्रेकरुंसाठी कोणतीही वयोमर्यादा असणार नाही.

दरम्यान, सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) हज आणि उमराह मंत्रालयाने ट्विट केले की, '#हज_एक्स्पो 2023 च्या उद्घाटनादरम्यान, H.E. हज आणि उमराह मंत्री डॉ तौफिक अल-रबियाह यांनी घोषणा केली: '1444H मध्ये हज यात्रेकरुंची संख्या वयाच्या निर्बंधांशिवाय कोरोना महामारीपूर्वी (Corona Epidemic) होती तशीच परत येईल.'

अरब न्यूजने वृत्त दिले की, 2019 मध्ये, सुमारे 2.5 दशलक्ष यात्रेकरुंनी हजमध्ये भाग घेतला. तथापि, कोविड-19 प्रसारामुळे, पुढील दोन वर्षांसाठी यात्रेकरुंची संख्या कमी करण्यात आली होती.

सौदी अरेबियामध्ये राहणारे लोक अर्ज करु शकतात

अरब न्यूजच्या वृत्तानुसार, याआधी 5 जानेवारी रोजी सौदी अरेबियाच्या हज आणि उमरा मंत्रालयाने जाहीर केले होते की, या वर्षी हज करु इच्छिणारे लोक हज यात्रेसाठी अर्ज करु शकतात. मंत्रालयाने सांगितले की, स्थानिक रहिवाशांसाठी हज पॅकेजच्या चार श्रेणी उपलब्ध असतील.

तसेच, तीर्थयात्रेसाठी अर्ज करणाऱ्या लोकांची जुलैच्या मध्यापर्यंत वैध राष्ट्रीय किंवा रहिवासी ओळख असणे आवश्यक आहे. यात्रेकरुंकडे COVID-19 आणि सीझनल इन्फ्लूएंझा लसीकरणाचा पुरावा असावा. याव्यतिरिक्त, त्यांना पवित्र स्थळांवर पोहोचण्याच्या किमान 10 दिवस आधी ACYW क्वाड्रपल मेनिंजायटीस लसीचे लसीकरण प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक आहे.

सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्रालयाने सर्व अर्जदारांना त्यांच्या वेबसाइटद्वारे थेट नोंदणी करण्याचे आणि एकापेक्षा जास्त अर्जांसाठी एकच मोबाइल नंबर वापरु नये असे आवाहन केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT