PM Narendra Modi & Faisal bin Farhan Al-Saud Dainik Gomantak
ग्लोबल

सौदी अरेबिया अफगाणिस्तानातील 'या' मुस्लिम देशांच्या भूमिकेबद्दल चिंतित

अफगाणिस्तानमधील (Afghanistan) तालिबान सरकारच्या स्थापनेत आणि कायदेशीर मान्यतेमध्ये कतारच्या भूमिकेबद्दल चिंतित आहेत.

दैनिक गोमन्तक

भारताचा सहयोगी असणाऱ्या सौदी अरेबिया (Saudi Arabia) आणि यूएईला (UAE) अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानच्या (Taliban) नियंत्रणाबद्दल चिंता सतावत आहे. सौदी अरेबियासाठी (Saudi Arabia) हा मुद्दा अधिक महत्त्वाचा मानला जात आहे. सौदीचे परराष्ट्र मंत्री प्रिंस फैसल बिन फरहान (Faisal bin Farhan Al-Saud) या आठवड्याच्या शेवटी भारताला भेट (India Visit) देणार असल्याचे शक्यता आहे. खरं तर, सौदी अरेबिया आणि यूएई अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारच्या स्थापनेत आणि कायदेशीर मान्यतेमध्ये कतारच्या भूमिकेबद्दल चिंतित आहेत. सौदी अरेबियाचा असा विश्वास आहे की, तालिबानच्या आगमनानंतर या प्रदेशात सुरक्षेशी संबंधित प्रश्न निर्माण होऊ शकतात.

सौदी अरेबिया आणि युएई अनेक मुस्लीम देशांवर नाराज

दोन्ही आखाती देश अफगाणिस्तानमध्ये कतार, पाकिस्तान आणि तुर्कीच्या सक्रिय भूमिकेबद्दल चिंतित आहेत. पाकिस्तानने काबूलबरोबर कमर्शियल फ्लाइट्सही सुरु केली आहे. कतार काबूल विमानतळाचे टेक्निकल ऑपरेशन करणार आहे. तालिबान सरकार तुर्की सैन्याला सुरक्षेची जबाबदारी देण्याचा विचार करत आहे.

कतारचे परराष्ट्र मंत्री अब्दुल रहमान अल थानी आणि विशेष दूत माजेद अल कुहतानी रविवारी काबूलमध्ये होते. आंतरराष्ट्रीय समुदायाने अद्याप तालिबानला अधिकृत मान्यता दिलेली नसली तरी आयएसआय तालिबानला लष्करी आणि राजकीय मदत देत आहे.

सौदी अरेबिया-युएई भारताच्या संपर्कात

सौदीचे परराष्ट्र मंत्री अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी 19 सप्टेंबरपर्यंत भारत दौऱ्यावर येऊ शकतात. याआधी 3 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदींनी सौदीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायेद अल नहान यांच्याशी फोनवर चर्चा झाली आहे. या व्यतिरिक्त, परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी काबूल संकटावर यूएईच्या राष्ट्राध्यक्षांच्या राजनयिक सल्लागारांशी देखील चर्चा केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Free Train To Konkan: चाकरमान्यांका बाप्पा पावलो! गणेशोत्सवात दादर ते कुडाळ करता येणार 'मोफत प्रवास', एका कॉलवर करा बुकिंग

पाहावं ते नवलचं! पक्ष्याचा 'मन की बात' मध्ये सहभाग, गोव्याच्या पर्यटन मंत्र्याच्या बसला खांद्यावर; Watch Video

Supriya Sule: गोवा मुक्ती, 1972 चे युद्ध... सुप्रिया सुळेंनी संसदेत नेहरु, इंदिरांचा इतिहासच काढला; तेजस्वी सूर्यांना दिले कडक उत्तर

Atishi In Goa: भ्रष्टाचारावर बोलणाऱ्यांची पदावरुन हकालपट्टी केली जाते, गोव्यात 'आप'च एकमेव पर्याय; आतिषी भाजपवर कडाडल्या

India vs Pakistan: "कुठल्या तोंडानं पाकिस्तानसोबत सामना खेळणार? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून ओवैसी आक्रमक, PM मोदींना केला सवाल

SCROLL FOR NEXT